पुण्यातील जयदेव पाल यांना आंतरराष्ट्रीय तायक्‍वांदो स्पर्धेत कांस्यपदक           

ग्वांगझू :

पुण्यातील जयदेव पाल यांनी दक्षिण कोरिया येथील ग्वांगझू येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्‍वांदो स्पर्धेतील पुमसे तायक्‍वांदो चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्यपदकाची मिळवले. ५० वर्षीयजयदेव पाल यांची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.

व्यवसायाने बांधकाम  कंत्राटदार असणारे जयदेव पाल हे मागील 3 वर्षांपासून प्रशिक्षक बाळकृष्ण भंडारी यांच्याकडे तायक्‍वांदोचे प्राथमिक आणि ऍडव्हान्स्ड प्रशिक्षण घेत आहेत. भंडारी असोसिएटस, आनंदतारा ग्रुप आणि गोयलगंगा डेव्हलपर्स यांनी पाल यांना स्पर्धेसाठी आर्थिक साहाय्य केले.
[amazon_link asins=’B00Y6EHHQ6,B0119ROQXY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e39a9f63-a6db-11e8-aaa7-159b016e13db’]
जयदेव पाल म्हणाले, मुलांना तायक्‍वांदोच्या क्‍लासेसला सोडायला जात असताना, आपणही तायक्‍वांदो शिकावे असे मला वाटले. याबद्दल सर्व माहिती घेऊन मी प्रशिक्षणाला सुरुवात केली. दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 तास आणि दर रविवारी 4 तास याप्रमाणे धावणे, सायकलिंग आणि व्यायाम नियमित सुरू केला. माझी तयारी बघून प्रशिक्षकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भात सुचविले आणि स्पर्धेसाठी आवश्‍यक तयारी करून घेतली. यानंतरही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पदके मिळविण्याची माझी इच्छा आहे.