धक्कादायक… बहीण-भावाच्या नात्याला काळीमा ; नराधाम भावाने बहिणीवर केला बलात्कार

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन – दहिवडी येथे बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नराधाम भावाने सावत्र बहिणीवरच बलात्कार केल्यामुळे तासगाव तालुक्यात खळबळ माजली आहे. यापूर्वी तासगाव तालुक्यात बोरगाव येथे चुलत बहिणीवरच भावाने बलात्कार केला होता. त्यानंतर आता दहिवडी ता तासगाव येथे सावत्र बहिणीवरच भावाने बलात्कार केला आहे.

पीडित मुलगी 14 वर्षांची आहे. ती सध्या अमृतवाडी ता जत येथे आई जवळ राहत आहे. पीडित मुलगी वडिलांच्या गावी (दहीवडी ता तासगाव) 30/5/19 रोजी आली असता. रात्री झोपल्यानंतर सावत्र भाऊ संभाजी आनंदराव जाधव (वय 30 रा दहीवडी ता तासगाव) याने तोंड दाबून बलात्कार केला. अशी माहिती तासगाव पोलिसांनी दिली आहे.

फिर्याद पीडित मुलीच्या थोरल्या बहिणीने तासगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान तासगाव पोलीस उपाधीक्षक अशोक बनकर यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. व तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले व आरोपी संभाजी आनंदराव जाधव (रा दहिवडी )यास ताब्यात घेतले. तासगाव पोलिसांनी 376(3), बाललैंगिक अत्याचार अधिनियम 2012 चे कलम 3,4 (आय)(एन)6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपाधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके हे करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like