… म्हणून वहिनीने कुर्‍हाडीनं घाव घालून नणंदेचा काढला काटा

जोधपूरः पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईलवर बोलण्यापासून रोखल्याने संतप्त वहिनीने नणंदेची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. राजस्थानच्या जोधपूरजवळील बडलिया गावात बुधवारी (दि. 14) ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिने गुन्हा कबूल केला आहे. नणंद ही वहिनीच्या चारित्र्यावर संशय घेत होती. त्यामुळे तिने मोबाईलवर बोलण्यापासून रोखले अन् भावाला सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे आपले लग्न मोडेल पती आपल्याला सोडून देईल या भीतीने तिने नणंदेचा काटा काढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

रेखा असे हत्या झालेल्या नणंदेचे नाव आहे. तर पुजा असे अटक केलेल्या वहिनीचे महिलेेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रेखा ही तिच्या लहान मुलीसह बडलिया गावात राहत होती. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी रेखाची वहिनी पुजा तिला भेटायला आली होती. त्यावेळी ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती. त्यामुळे रेखाने तिला फोनवर बोलण्यापासून अडवल आणि भावाला सांगण्याची धमकी दिली. त्यावर वाद वाढला आणि पुजाने कुऱ्हाडीने रेखाच्या डोक्यावर वार करत तिची हत्या केली. 14 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर पुजाने मृतदेह घरातील एका लोखंडी पेटीमध्ये भरला अन् त्यावर रोजच्याप्रमाणे अंथरुन टाकले. यावेळी रेखाची लहान मुलगी घरातच होती. पण तिला काही कळाले नाही. पुजाने रेखाला तिची आई कामासाठी बाहेर गेल्याचे सांगितले. दुस-या दिवशी रेखाची मुलगी लोखंडी पेटीवर अंथरूण ठेवण्यास गेली असता तिला त्यातून दुर्गंधी आली. त्यानंतर ही पेटी उघडली असता सर्व प्रकार समोर आला. पोलिसांना ही माहिती समजल्यानंतर तपास सुरू केला. पोलिसांनी रेखाची वहिणी पुजाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने लगेच गुन्हा कबूल केला आहे.