खुशखबर ! BSNL देणार केबल TV सेवा, फक्त 243 रूपयांचे पॅकेज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जिओच्या अनेक मोठ्या योजनांनंतर सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएल कडून ग्राहकांना केबल टीव्हीची सेवा दिली जाणार आहे. याच्या पॅकेजची सेवा 243 रुपयांपासून सुरु होणार आहे.

केबल टीव्हीशी भागीदारी
बीएसएनएलने ग्राहकांना केबल टीव्ही कनेक्शन देण्यासाठी श्री देवी टेलिव्हिजनसोबत भागीदारी केली आहे. आंध्र प्रदेशामध्ये ही सेवा सुरु करण्यात आलेली आहे. बीएसएनएलने सुरु केलेल्या ट्रिपल प्ले प्लॅन नुसार ग्राहकांना ब्राँडबँड, लँडलाईन आणि केबल सेवा दिली जाणार आहे.

काय असेल पॅकेज ?
आतापर्यंत बाजारात असलेल्या योजनांमध्ये फायबर कॉम्बो 645, फायबर कॉम्बो युएलडी 2795 सीएस 20 यांचा समावेश आहे. यात 849 रुपयांपासून ते 16 हजारापर्यंतच्या प्लॅनचा समावेष आहे. तर हे सर्वच पॅकेज अनलिमिटेड कॉलिंग असलेले आहेत.

वेगळे टेलिफोन उपकरण खरेदी करावे लागेल
ट्रिपल प्लॅन घेतलेल्या ग्राहकांसाठी श्रीदेवी टेलिव्हिजन कंपनी तर्फे वेगवेगळी 7 पॅकेजेस देण्यात आलेली आहेत. यापैकी 243 रुपयांचे सर्वात स्वस्त तर 360 रुपयांचे सर्वात महागडे पॅकेज आहे. तसेच या पॅकेजमध्ये असलेल्या ग्राहकाला मोबाईल सेवादेखील हवी असेल तर त्यासाठी वेगळे उपकरण घ्यावे लागणार आहे. कंपनी तर्फे ते उपकरण लावून देण्यात येईल.

Visit : Policenama.com