BSNL नं लॉन्च केला 80 दिवसांकरिताचा ‘स्वस्त’ आणि ‘मस्त’ प्लॅन, ‘हे’ 2 प्लान बंद, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमुळे सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLची मागणी वाढली आहे. BSNLची शहरी भागासह ग्रामीण भागात कनेक्टिविटी चांगली असल्याने ग्राहकांची चांगली मागणी आहे. त्यामुळे ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून BSNL ने 80 दिवसांचा एक स्वस्त प्लान आणला आहे. या प्लानची किंमत दुसऱ्या खासगी कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे. हा प्लान लाँच करताना BSNL ने आपले दोन प्लान बंद केले आहेत.

BSNL च्या नवीन प्रीपेड प्लानची किंमत 399 रुपये आहे. यामध्ये ग्राहकाला 80 दिवसांची वैधता मिळणार आहे. तसेच 250 मिनिट कॉलिंग मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्संना रोज 1 जीबी डेटा देखील मिळणार आहे. या प्लानमध्ये लोकधुन कंटेट सुध्दा फ्री मिळणार आहे. तसेच रोज 100 एसएमएस मिळणार आहेत. हा प्लान 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

हे 2 प्लान बंद
कंपनीने आपले दोन प्लान बंद केले आहेत. यात 399 आणि 1699 रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. म्हणजेच हे दोन्ही प्लान 15 ऑगस्ट पासून बंद करण्यात येणार आहेत. तर 399 रुपयांचा नवीन प्लान ॲक्टिव्ह करण्यात येणार आहे. BSNLचा नवीन प्लान चेन्नई आणि तामिळनाडू सर्कलमध्ये उपलब्ध आहे. तसेच जे दोन प्लान बंद होणार आहेत. ते देखील या दोन सर्कलमधील आहेत.

काही दिवसांपूर्वी BSNLने चेन्नई सर्कलमध्ये 147 रुपयांचा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. या प्लानची वैधता 30 दिवसांची असून प्लानसोबत ग्राहकांना एकूण 10 जीबी डेटा मिळतो. याशिवाय कंपनीने 247 रुपयांचा प्लानला अपडेट केले आहे. यानुसार याची वैधता 36 दिवसांची करण्यात आली आहे. यापूर्वी याची वैधता 30 दिवसांची होती. तसेच 1999 रुपयांच्या प्लानची वैधता 439 दिवसांची करण्यात आली आहे.