फक्‍त 700 रूपयांमध्ये ‘ब्रॉडबॅन्ड’, ‘लॅन्डलाइन’ आणि ‘सेटटॉप बॉक्स’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बाजारातील खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNL ने आपला धमाकेदार प्लॅन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. BSNL आपल्या ग्राहकांना ब्रॉडबॅन्डच्या माध्यमातून केबल ऑपरेटर्सकडून सेटटॉप बॉक्स देणार आहे. एका रिपोर्ट नुसार ही माहिती मिळाली आहे. यासंबंधित BSNL केबल ऑपरेटर्सशी चर्चा करत आहे. BSNL कडून ग्राहकांना लॅंडलाइन आणि ब्रॉडबॅंड सेवा देणार आहे.

याची किंमत आणि इतर बाबीबद्दल BSNL ने अजून कोणतीही आधिकृत घोषणा केली नाही. परंतू रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, यात ट्रिपल प्ले प्लॅन असणार आहे ज्यात ग्राहकांना 700 रुपयात उपलब्ध होईल. यात तीन सेवा एकत्र एकाच ऑप्टिकल फायबर केबल अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येईल.

यात सांगण्यात आले की या सेवा केबल ऑपरेटर्सच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येतील. BSNL आणि केबल ऑपरेटर्स तीन कनेक्टिंसमध्ये ONT डिवाइस उपलब्ध करुन देण्यात येतील. BSNL आपल्या ग्राहकांना सेटटॉप बॉक्स देण्यासाठी श्रीदेवी डिजिटल प्रायवेट लिमिटेड आणि सागा सिटी सॉल्युशन्स सारख्या केबल ऑपरेटर्सबरोबर करार केला आहे.

सध्या BSNL प्रति महिने 170 रुपये प्लॅन आणि प्रति महिना जवळपास 440 रुपये ब्रॉडबॅन्ड प्लान आहे. दुसऱ्या स्टॅडर्ड टीव्ही ऑपरेटर्सचा विचार केला तर सध्या ग्राहकांना 200 ते 300 रुपये प्रतिमहिना द्यावे लागते, ज्यात त्याची एकूण किंमत जवळपास 900 रुपये आहे. परंतू हे सर्व BSNL च्या ट्रिपल प्लॅनमध्ये ग्राहकांना एकत्र मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त –