नेटवर्क गुल … तरीही करा बिनधास्त कॉलिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या बीएसएनएलनं खराब नेटवर्क असलेल्या भागांसाठी एक नवीन ॲप आणले आहे. या ॲपच्या मदतीनं ग्राहकांना मोबाइल नेटवर्कविना इंटरनेट कॉल करता येणार आहे. ‘विंग्स ॲप’ असं या ॲपच नाव असून या ॲपवरून मिळणारी सुविधा मात्र मोफत नाही. या सुविधेसाठी ग्राहकांना वर्षभरासाठी एकदाच पैसे द्यावे लागतील.

‘अशी’ मिळवा  सुविधा
प्ले स्टोरमध्ये ‘विंग्स ॲप’ हे ॲप डाउनलोड करावे लागेल. ग्राहकांना १,०९९ रुपये भरावे लागतील. त्यानंतर तुमच्या फोनवर विंग्स ॲप एका वर्षासाठी ॲक्टिव्हेट होईल. ॲपशिवाय ग्राहकांना एसआयपी (सेशन इनिशिएशन प्रोटोकॉल) डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर ग्राहकाला १० अंकी एक सबस्क्रिप्शन आयडी दिला जाईल आणि रजिस्टर्ड मेल आयडीवर १६ अंकी पिन क्रमांक पाठवला जाईल. तो क्रमांक टाकल्यानंतर विंग्स सुविधा सुरू होईल.

विंग्ज ॲपसाठी ग्राहकांना बीएसएनएलच्या वेबसाइटवर रजिस्टर करावं लागणार आहे. ओळखपत्र पुराव्यांसहित राहण्याचं ठिकाण आणि फोटो अपलोड केल्यानंतर रजिस्टर करता येऊ शकतं. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना ‘विंग्स पिन’ Wings Pin पाठवला जाईल. गुगल प्ले स्टोरमधून विग्स ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर त्यात विंग्स पिन टाकावा लागेल. मोबाइल नेटवर्क जिथे पोहोचत नाही, तिथे या ॲपच्या मदतीनं कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ॲपवर कोणतीही बंधनं अथवा मर्यादा नाही. इंटरनेट पुरवणारी कंपनी कोणतीही असली तरी, ग्राहकांना व्हीओआयपी (व्हाइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) सुविधा अधिक चांगली मिळणार आहे.