BSNL Plan | BSNL चा ‘हा’ स्वस्त प्लान Airtel-Vi-Jio वर पडतोय भारी, फक्त 7 रूपयांमध्ये दररोज मिळतोय 5 GB डेटा-कॉलिंग; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय टेलिकॉम (Indian Telecom) बाजारात रिलायन्स जिओ (Reliance Jio), भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि वोडाफोन आयडियाचा (Vodafone Idea) दबदबा आहे. या कंपन्या ग्राहकांना कमी किमतीत अधिकचा फायदा देणारे प्लान्स उपलब्ध करुन देत आहेत. तर दुसरीकडे सरकारी टेलिकॉम कंपनी (Government Telecom Company) बीएसएनएल (BSNL Plan) आपल्या प्लान्सद्वारे Airtel – Vi – Jio ला जोरदार टक्कर देत आहे. बीएसएनएलकडे अनेक जबरदस्त प्लान्स (BSNL Plan) आहे, ज्यामध्ये अधिकचा फायदा मिळतो. कंपनीकडे असे तीन प्लान्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये डेटासह अनलिमिटेड कॉलिंगचा (Unlimited Calling) फायदा तर मिळतोच शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मचे (OTT Platform) देखील सब्सक्रिप्शन (Subscription) मिळते. जाणून घ्या प्लानबाबत

 

BSNL चा 298 आणि 429 रुपयांचा प्लान
बीएसएनएलकडे 429 रुपयांचा प्लान असून, यामध्ये ओटीटी बेनिफिट्स मिळतात. या प्लानची वैधता 81 दिवस आहे. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज 2 जीबी डेटा मिळतो. तसेच 100 SMS मोफत मिळतात. या प्लानमध्ये यूजर्सला झिंग आणि बीएसएनएल ट्यून्सचा ॲक्सेस मिळतो. हा प्लान तुम्हाला कंपनीच्या वेबसाईटवरुन खरेदी करता येईल. (BSNL Plan)

BSNL चा 599 रुपयांचा प्लान
कंपनीकडे जास्त वैधता व डेटा ऑफर असणारा 599 रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज तब्बल 5 जीबी डेटा दिला जातो. हा डेटा संपल्यानंतर यूजर्स 80 केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरु शकतात. या प्लानची वैधता 84 दिवस आहे. प्लानमध्ये यूजर्सला अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळतो. प्लानमध्ये झिंग स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय यूजर्सला रात्री 12 ते सकाळी 5 पर्यंत अनलिमिटेड डाटाचा फायदा मिळतो.

 

Web Title :- BSNL Plan | bsnl rs 599 prepaid plan gives 5gb data per day with 84 days validity

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा