BSNL चे 2 जबरदस्त प्लान लाँच, ‘हे’ बेनिफिट्स मिळणार, जाणून घ्या किंमती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने दोन जबरदस्त प्लान लाँच (Plan Launch) केले आहेत. 199 आणि 251 रुपयांचे दोन प्रीपेड प्लान लाँच केले असून यामध्ये एका महिन्याच्या वैधतेसोबत कंपनी 70 जीबी पर्यंत डेटा ऑफर करीत आहे. BSNLने 251 रुपयांचा आणखी एक वर्क फ्रॉम होम प्लान लाँच केला आहे. तर 199 रुपयांच्या प्लानमध्ये डेटा आणि कॉलिंग सोबत अनेक फायदे मिळतात. जाणून घ्या प्लान संबंधी आणि बेनिफिट बाबत…

BSNL चा 199 रुपयांचा प्लान

BSNL च्या प्लानमध्ये युजर्संना रोज 2 GB डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये 30 दिवसांची वैधता देण्यात आली असून युर्जर्सना लोकल आणि एसटीडी कॉलिंगसाठी 250 मिनिट्स मिळणार आहेत. याशिवाय 100 फ्री एसएमएससोबत हा प्लान सध्या राजस्थान सर्कलमध्ये ऑफर केला जात आहे.

BSNL चा 251 रुपयांचा प्लान

ज्या युजर्संना जास्त डेटाची आवश्यकता आहे, अशा युजर्संना हा प्लान बेस्ट आहे. प्लानमध्ये कंपनी 28 दिवसांची वैधता देते याशिवाय 70 GB डेटा देते. मात्र, या प्लानमध्ये युजर्संना फ्री एसएमएस बेनिफिट मिळत नाही.

998 रुपयांच्या प्लानमध्ये डेटा वाढला

BSNL ने 24 डिसेंबर पासून आपल्या 998 रुपयांच्या एसटीव्हीमध्ये मिळणारा डेटा वाढवला आहे. प्रमोशनल ऑफर अंतर्गत कंपनी या प्लानमध्ये आता रोज 2 GB ऐवजी 3GB डेटा देत आहे. या प्लानची वैधता 240 दिवसांची आहे.