Budget 2019 Live updates : आम्ही महागाईचीच कंबर तोडली आहे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारचा शेवटचा आणि अंतरिम अर्थसंकल्प सध्या संसदेत सादर केला जातो आहे. लोकसभेत आज पियुष गोयल यांनी सरकारच्या सफलतेचा पाढाच वाचून काढला आहे. भाषणाची सुरुवातच सरकारच्या योजनांच्या सफलतेतून झाला. सरकारच्या तोट्याचा दर आता ६ टक्क्यावरून २.५ आल्याचा उल्लेख करताच सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्या या विधानाला बाके वाजवून अनुमोदन दिले.

महागाईच्या मुद्दयांवर पियुष गोयल यांनी सरकारने चांगली कामगिरी केल्याचे म्हणले आहे. “ग्राहकांची कंबर तोडणाऱ्या महागाईची आम्ही कंबर तोडली आहे” असे पियुष गोयल म्हणाले आहेत.

त्याच प्रमाणे २०२० साला पर्यंत प्रत्येकाला घर देण्यात येईल अशी घोषणा पियुष गोयल यांनी आज पुन्हा संसदेत अर्थसंकल्प सादर करताना केली आहे. गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी सरकारने आपल्या जाहीरनाम्यातच सर्वाना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा शब्द देण्यात आला आहे. त्या दृष्टीने भाजपा सरकार मार्गक्रमण करत आहे. त्याच प्रमाणे केंद्रा कडून राज्यांना दिला जाणारा निधी आता १० टक्क्यांनी वाढवला जाणार आहे असे पियुष गोयल म्हणाले आहेत.

आम्ही आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या उच्च जातींच्या लोकांना आरक्षण दिले आहे. यातून आम्ही सामाजिक न्याय प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करत आहे असे पियुष गोयल म्हणले आहेत. १ कोटी ५३ लाख घर सरकारने बांधून गरीब लोकांना उपलब्ध करून दिले आहेत. त्या माध्यमातूनच गरिबांना सबका साथ सबका विकास साध्य करण्यास आम्ही यशस्वी झालो आहे असे पियुष गोयल म्हणाले आहेत.  त्याच प्रमाणे १४३ कोटी एलईडी बल्ब वितरित करून ५० हजार कोटी रुपयांची वीज वाचवल्याचा दावा हि अर्थसंकल्पाच्या भाषणा वेळी पियुष गोयल यांनी केला आहे.