Budget 2021 : यंदाच्या बजेटमधील दोन वैशिष्ट्ये काय ?, सीतारमन म्हणतात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर याबाबतच्या महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होत आहेत. या अर्थसंकल्पातून करदात्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. पण या बजेटमध्ये दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्याबाबत स्वत: निर्मला सीतारमन यांनी उत्तर दिले.

सीतारमन म्हणाल्या, या बजेटच्या माध्यमातून आम्ही इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते, वीज निर्मिती, पूल, बंदर या क्षेत्रांवर खर्च केला जाणार आहे. तर या बजेटची दुसरी विशेषता आहे ती म्हणजे हेल्थकेअर सेक्टर. ज्याप्रकारे मागील वर्ष गेले. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे होते.

हे बजेट ज्यावेळी आले आहे, जेव्हा आम्ही अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा निर्णय घेतला आणि आमचे म्हणणे आहे, की जर मागणी वाढण्यासाठी आवश्यक उपाय केले तर यामध्ये वेग दिसेल. तसेच आता सरकारी खर्चाचा तपशील ठेवणे अधिक पारदर्शी झाले आहे. त्यांनी सांगितले, की आपले आर्थिक नुकसान फेब्रुवारी 2020 दरम्यान 3.5 टक्क्यांनी सुरु झाले होते. पण जीडीपी 9.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.