Budget 2021 : होय, शेतीसाठी दारूवर लागणार 100 % ‘सेस’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी भरघोस तरतूद अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दाखवलीय. कृषी सुविधा करापोटी काही उत्पादनांवर विशेष अधिभार लावला जाणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या दारूवर यातला 100 टक्के सेस लावण्यात येईल. ‘कृषी सुविधा विकास कर’ नावाने हा अधिभार लावण्यात येणाराय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्कोहोलिक पेयांवरची बेसिक कस्मट ड्युटी कमी करून हा सेस वाढवल्यामुळे ग्राहकांवर बोजा पडणार नाही.

पुढे सीतारामन म्हणाल्या, कृषी क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा विकासासाठी निधी या करातून निर्माण होणार आहे. 100 टक्के कराची तरतूद असली तरी त्याचं ग्राहकांवर थेट ओझं पडणार नाही, याची तरतूद केलीय. व्हिस्की, स्कॉच, बरबन, ब्रँडी अशा सर्व प्रकारच्या विदेशी दारूवर किंवा अल्कोहोलिक पेयांवर 100 टक्के कृषी अधिभार सर्व प्रकारच्या लावला जाईल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्यात. कृषी पत लक्ष्य वाढविण्याविषयी माहिती दिलीय. त्यांचे सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करण्यास कटिबद्ध आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं की, 2021-22 मध्ये शेतकर्‍यांना अधिकाधिक कृषी पतपुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. मागील वर्षी हे लक्ष्य 15 लाख कोटी होते, त्यात यंदा 1.5 लाख कोटींची वाढ होऊन हे लक्ष्य 16.5 लाख कोटी रुपये केले आहे. अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, आमचं सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. सर्व पिकांवर उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट एमएसपी दिला जाणार आहे.