Budget 2020 : रेल्वेसाठी केली जाऊ शकते ‘ही’ व्यवस्था, ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ वर असणार ‘फोकस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 फेब्रुवारी 2020 च्या अर्थसंकल्पात सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पातून देखील लोकांना अनेक अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न भारतीय रेल्वेला अर्थव्यवस्थेचे ग्रोथ इंजिन बनवायचे आहे. त्यामुळे अपेक्षा आहेत की रेल्वेसाठी सरकार आपल्या तिजोरीतला पैसा खर्च करेल. तसेही केंद्र सरकारचा फोकस इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे. त्यामुळे रेल्वे विस्तारासह अत्याधिनुक रेल्वे बनवण्याची घोषणा सरकार करु शकते.

कॅपेक्स कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये यावर्षी 18 टक्के फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या आर्थिक वर्षात कॅपेक्स 1.6 लाख कोटी रुपये आहे, जे वाढून 1.8 किंवा 1.9 लाख कोटी रुपये होईल. रेल्वेसंबंधित इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्ताराचा विचार करता अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकतेच नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन जाहीर करत पुढील 10 वर्षांपूर्वी रेल्वे कॅपेक्समध्ये दरवर्षी 18 टक्के वृद्धीचे लक्ष आहे.

यावर्षी रेल्वेला अर्थसंकल्पाच्या हिश्याच्या तुलनेत 10 टक्के जास्त निधी मिळेल अशी अपेक्षा आहे. रेल्वे अर्थसंकल्पाला मुख्य रुपात लक्ष केले जाऊ शकते. इंफ्रास्ट्रक्चर, प्रायवेट प्लेअर्सशी जोडने आणि सुरक्षा याची समावेश आहे. 2019 – 20 च्या 65,837 कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी रेल्वेला जवळपास 72,000 कोटी रुपये मिळू शकतात.

रेल्वे अर्थसंकल्पात यावेळी ट्रेन सेट 18 किंवा वंदे भारत ट्रेनच्या विस्ताराची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात खासगी रेल्वेच्या प्रकारात सरकारचा रोख स्पष्ट आहे. अशी माहिती मिळत आहे की आणखी पाच रेल्वे IRCTC ला दिल्या जाऊ शकतात. पहिल्यांदा IRCTC चालवेल आणि त्यानंतर त्यांना खासगी व्यवस्थापनाकडे सोपवण्यात येईल.

मिशन स्पीड अपग्रेडअंतर्गत कोणत्याही मार्गावर चालणाऱ्या रेल्वे 160  अ‍ॅवरेज स्पीडसाठी अपग्रेड केल्या जाऊ शकतात. अर्थसंकल्पात 100 टक्के विद्युतीकरणाचे लक्ष प्राप्त करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाऊ शकते. याशिवाय सिग्नल व्यवस्थेचे अत्याधुनिकीकरण करण्याची घोषणा होऊ शकते.

रेल्वेच्या संबंधित सेवांचा विस्तार याद्वारे करण्यात येईल अशी शक्यता आहे. यामुळे रेल्वेंची रिअल टाइम मॉनिटरिंग आणखी सोपी होईल. तसेच प्रवाशांचे रेल्वे स्टेशनवर मनोरंजन आणि वायफायची सुविधा याच्या विस्ताराची शक्यता आहे.