Buldhana ACB Trap | खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देण्यासाठी लाचेची मागणी, 5 हजार रुपये लाच स्वीकारताना कारकून अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election) उमेदवारांनी केलेल्या निवडणूक खर्चाचा तपशील (Election Expenses) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यासाठी 5 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तहसील (Deulgaon Raja Tehsil) कार्यालयातील अव्वल कारकूनाला बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Buldhana ACB Trap) रंगेहात पकडले. रामेश्वर रुस्तुम कर्हाळे Rameshwar Rustum Karhale (वय-36 रा. सिनगाव जहाँगीर, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या कारकूनाचे नाव आहे. बुलढाणा एसीबीच्या पथकाने (Buldhana ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.9) केली.

 

याबाबत देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव येथील 42 वर्षाच्या व्यक्तीने बुलढाणा एसबीकडे (Buldhana ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी डिसेंबर 2022 मधे झालेल्या गोळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास पॅनल तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रत्येक उमेदवारास विहीत मुदतीत निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करणे बंधनकारक असल्याने, तक्रारदार यांनी बुधवारी (दि.4) त्यांच्या पॅनलच्या एकूण 8 उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा तपशील अव्वल कारकून रामेश्वर कर्हाळे यांचेकडे सादर केला.

 

रामेश्वर कर्हाळे यांनी तक्रारदार यांना पॅनल मधील उर्वरित दोन उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा तपशील घेऊन येतांना प्रती उमेदवार 500 रुपये याप्रमाणे एकूण दहा उमेदवारांचे 5 हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले. पैसे दिले तरच तुम्हाला निवडणूक खर्चाचे प्रमाणपत्र देतो, असे सांगितले. तक्रारदार यांनी बुलढाणा एसीबीकडे याबाबत तक्रार केली.

बुलढाणा एसीबीच्या पथकाने सोमवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता अव्वल कारकून रामेश्वर कर्हाळे
यांनी निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रामेश्वर कर्हाळे याला रंगेहात पकडण्यात आले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र पोलीस अधिक्षक मारुती जगताप (SP Maruti Jagtap),
अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत (Addl SP Arun Sawant), पोलीस उप अधीक्षक देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware)
यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीम एसीबीचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी (DySP Sanjay Chaudhary),
पोलीस अंमलदार विलास साखरे, राजु क्षिरसागर, अतरोद्दीन काझी, चालक नितीन शेटे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :-  Buldhana ACB Trap | Demand for bribe to provide details of expenses to election decision officials, clerk caught in anti-corruption net while accepting bribe of Rs.5,000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी-गुजरात को देंगे’, जयंत पाटलांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Former MLA Mohan Joshi | कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी मोहन जोशी

Anil Deshmukh | काटोल, नरखेड तालुक्यातील जनतेच्या प्रमुख मागणीचे अनिल देशमुखांकडून मुख्यमंत्र्याना पत्र…

MP Arvind Sawant | ‘राज्यातील सरकार घटनाबाह्य’, सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी अरविंद सावंतांचा शिंदे सरकारवर घणाघात