Buldhana ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना उपजिल्हाधिकारी, वकील, वरिष्ठ लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

0
732
Buldhana ACB Trap | Deputy Collector, lawyer, senior clerk in anti-corruption net while taking bribe of 1 lakh
file photo

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – प्रकल्पात गेलेल्या वडिलोपार्जीत जमीनीचा शासकीय मोबदला देण्यासाठी 2 लाख 17 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी एक लाख रुपये लाच घेताना (Accepting Bribe) उपजिल्हाधिकारी (भुसंपादन मध्यम प्रकल्प), वकील (Advocate) आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपीक (Senior Clerk) यांना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Buldhana ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. बुलढाणा एसीबीने (Buldhana ACB Trap) ही कारवाई बुधवारी (दि.28) केली.

 

उपजिल्हाधिकारी भिकाजी शेषराव घुगे Deputy Collector Bhikaji Seshrao Ghuge (वय 56), लिपीक नागोराव महादेवराव खरात Nagorao Mahadevrao Kharat (वय-47 रा. सत्यम अपार्टमेंट, सुंदरखेड ता. जि. बुलढाणा), वकील अनंत शिवाजीराव देशमुख Adv. Anant Shivajirao Deshmukh (वय- 32 रा. मोताळा ता. मोताळा जि. बुलढाणा) अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत नांदुरा तालुक्यातील हिंगणा इच्छापुर येथील 18 वर्षीय व्यक्तीने बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Buldhana ACB Trap) तक्रार केली आहे.

 

तक्रारदार यांची वडिलोपार्जित जमीन जिगाव प्रकल्पात (Jigaon Project) गेली आहे. या जमिनीचा शासकीय मोबदला मिळवून देण्यासाठी लिपीक नागोराव खरात यांनी तक्रारदार यांना उपजिल्हाधिकारी यांना 2 लाख 17 हजार रुपये देण्यास सांगितले. दरम्यान, तडजोडीअंती भिकाजी घुगे यांनी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी बुलढाणा एसीबीकडे याबाबत तक्रार केली.

बुलढाणा एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि.26) पडताळणी केली.
त्यावेळी भिकाजी घुगे यांनी दोन लाख 17 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती एक लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले.
पथकाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचला. उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी लाचेची एक लाख रुपये रक्कम वकिल अनंत देशमुख यांच्याकडे देण्यास सांगितले.
घुगे यांच्या सांगण्यावरुन देशमुख यांना तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
यानंतर भिकाजी घुगे आणि लिपीक नागोराव खरात यांना ताब्यात घेण्यात आले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र पोलीस अधिक्षक मारुती जगताप (SP Maruti Jagtap),
अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत (Addl SP Arun Sawant), पोलीस उप अधीक्षक देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware)
यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीम एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके (Washim ACB DySP Gajanan Shelke),
पोलीस निरीक्षक महेश भोसले (Police Inspector Mahesh Bhosale), पोलीस अंमलदार विलास साखरे,
नितीन तवलारकर, प्रवीण बैरागी, जगदीश पवार, विनोद लोखंडे, चालक अरशद शेख यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Buldhana ACB Trap | Deputy Collector, lawyer, senior clerk in anti-corruption net while taking bribe of 1 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Subhash Desai | सुभाष देसाईंनी एक हजार कोटींचा घोटाळा केला, खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

Pune Crime | मुलुंड येथील बनावट कॉल सेंटरद्वारे महिलेची फसवणूक करण्याऱ्या आरोपीस जामीन मंजूर

Winter Session 2022 | चर्चेशिवाय, विरोधकांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर…