Bulli Bai App Case | ‘बुल्लीबाई’ प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ! सिव्हिल इंजिनिअरिंगचा 21 वर्षीय विद्यार्थी ताब्यात

बेंगळुरू : वृत्तसंस्था – बुल्लीबाई अ‍ॅपच्या (Bulli Bai App Case) माध्यमातून काही मुस्लिम महिलांची (Muslim women) बदनामी (Defamation) केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) येथे गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले. दाखल गुन्ह्यांच्या तपासाला आता गती आली असून मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पथकाने आज बेंगळुरू (Bangalore) येथे छापा टाकून एकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाला मुंबईत आणून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. मात्र, अद्याप त्याला अटक (Arrest) करण्यात आलेली नाही. बुल्लीबाई प्रकरणात (Bulli Bai App Case) मुंबई पोलिसांनी केलेली मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

 

बुल्लीबाई प्रकरणी (Bulli Bai App Case) रविवारी मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तांत्रीक पुराव्यांच्या आधारे तपास सुरु केला. त्यानंतर आज लगेचच बेंगळुरूत छापा टाकून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. हा तरुण सिव्हिल इंजिनीअरिंग (Civil Engineering) करत असून सेकंड ईयरला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. बुल्लीबाई अ‍ॅपवरील पाच फॉलोअर्सपैकी एक असलेल्या या तरुणाची मुंबईत नेऊन अधिक चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर त्याला अटक केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. त्याच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याचीही शक्यता आहे.

 

महिला पत्रकाराला टार्गेट केल्यानंतर प्रकार उघडकीस

सोशल मीडियात सक्रिय (Social Media Active) असलेल्या किमान
100 मुस्लिम महिलांना बुल्लीबाई अ‍ॅपच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे.
त्यात एका महिला पत्रकाराचाही समावेश असून त्यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे (Delhi Police Cyber Cell)
याबाबत ऑनलाईन तक्रार केली आहे.
याची दखल घेत रविवारी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
त्याचवेळी मुंबई पोलिसांनी बुल्लीबाई प्रकरणात कारवाई करुन पहिली मोठी कारवाई केली आहे.
हे अ‍ॅप तयार करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत असल्याने तपासाला वेग आला आहे.

 

Web Title :- Bulli Bai App Case | bulli bai app case 21 year old engineering student detained from bengaluru says mumbai police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा