पोलिस स्टेशन परिसरात उभी असलेली वाहने जळुन खाक. रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यातील प्रकार

शिक्रापुर : शिरुर तालुक्याच्या रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या मागील बाजुस उभी असणारी वेगवेगळ्या गुन्ह्यातील तसेच बेवारस वाहनांना शनिवार (दि ६) रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास अचानक आग लागल्याने १ चारचाकी सह २१ दुचाकी आगीत जळून खाक झाल्या असुन सुमारे अंदाजे ६ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर तातडीने रांजणगाव MIDC पोलिस व रांजणगाव MIDC अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवार (दि ६) रोजी सायंकाळच्या सुमारास पोलिस स्टेशनच्या पाठीमागे असलेल्या इलेक्ट्रिकल पोलच्या जवळ उभ्या असलेल्या वेगवेगळ्या गुन्हात जप्त केलेल्या तसेच बेवारस वाहनांना अचानक आग लागल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच तात्काळ रांजणगाव MIDC येथील अग्निशमन दलास संपर्क करुन पोलीस स्टेशनमधील वाहनांना आग लागल्याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच रांजणगाव MIDC अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. माञ या आगीत १ चारचाकी आणि २१ दुचाकी वाहने जळुन खाक झाली आहेत.

तर प्राथमिक माहिती नुसार पोलीस स्टेशनच्या पाठीमागे विजेचा खांब असुन बऱ्याचवेळा या खांबावरील तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्यामुळे स्पार्किंग होत असत. असाच स्पार्किगच्या प्रकारातुन ही आग लागली असावी. तर येथे वाळलेली गवत असल्याने मोठा प्रमाणावर वाहने जळून नुकसान झाले