खाकी वर्दीत माणुसकी जिवंत: निर्मनुष्य बस स्टॉपवर तरुणीसाठी थांबवून ठेवली बस 

मुंबई: पोलीसनामा आॅनलाईन 
आजकालच्या जगात माणुसकी हरवत चालल्याचं सर्वांकडून बोललं जात आहे, शिवाय आपण तशी परिस्थिती असल्याचं अनेकदा अनुभवतोसुद्धा. त्यातही शहर म्हटलं की, फ्लॅट सिस्टीम समोर येते. त्यातही मुंबई म्हटलं तर सर्वात पहिली समोर दिसते ती म्हणजे धावपळ. या धावपळीच्या आयुष्यात लोकांना एकमेकांसाठी वेळच नसतो. अनेकदा या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकजण माणुसकी हरवल्याची तक्रार करत असतो. पण काही वेळा अशा काही घटना समोर येतात ज्यामुळे माणुसकी अद्यापही जिवंत आहे यावर विश्वास बसतो. अशीच एक घटना समोर आली आहे जिथे निर्मनुष्य बस स्टॉपवर तरुणीसाठी बस ड्रायव्हर आणि चालकाने बस १० मिनिटे थांबवून ठेवली. जोपर्यंत त्या तरुणीला रिक्षा मिळत नाही तोपर्यंत बस तिथेच थांबून होती. तरुणीने हा प्रसंग शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ड्रायव्हर आणि कंडक्टरचं कौतूक केलं जात आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92645af3-cb07-11e8-bda1-457f08defbf1′]
रात्री १.३० वाजता मंताशा शेखआरे कॉलनी येथील निर्मनुष्य रस्त्यावर  उतरली होती. मंताशा आरेमधील रॉयल पाल्म्स येथील रहिवासी आहे. मंगळवारी संध्याकाळी ती आपल्या नातेवाईकाच्या घरी गेली होती. मात्र तेथून निघताना वेळेचं भान राहिलं नाही. साकीनाका येथून तिने बस पकडली आणि रात्री १.३० वाजता आरे कॉलनीत पोहोचली. रात्रीचे १.३० वाजले असल्याने चालक प्रशांत मयेकर आणि कंडक्टर राज दिनकर यांनी तिला घरातून कोणी नेण्यासाठी येणार आहे का ? अशी विचारणा केली. मंताशा शेखने नाही असं सांगताच दोघांनीही जोपर्यंत तिला बस मिळत नाही तोपर्यंत बस थांबवून ठेवली. इतकंच नाही तर रिक्षा योग्य दिशेने जात असल्याची खात्री होत नाही तोपर्यत ते थांबून होते.
सदर अनभवाबद्दल मतांशाने या ट्विट केलं आहे. ती दोघांच्या कृतीने भारावून गेली. या निस्वार्थ कृतीमुळे मी पुन्हा एकदा या शहराच्या प्रेमात पडले आहेत. ‘यामुळेच माझं मुंबईवर प्रचंड प्रेम आहे. ३९४ लिमिटेड बसच्या चालकाचे आभार’, असं मंताशाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
This is the reason i love #Mumbai
I would like to thanks #Best Bus driver of 398 ltd. Who dropped me at 1.30 am at a deserted bus stop and asked me if someone is there to pick me up. To which i replied no. He made the entire bus wait until i got the auto. @WeAreMumbai
[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’43769900-cb09-11e8-8ef0-7b86d5d0f9bf’]
ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून जवळपास दोन हजार जणांनी रिट्विट केलं असून पाच हजार जणांनी लाइक केलं आहे. एकीकडे देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत असताना, त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना ही घटना थोडा दिलासा देणारी आहे.