Indirect Tax Refund दाव्यांचा ‘तात्काळ’ होणार ‘निपटारा’, सरकारनं सुरू केली विशेष मोहीम

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या अप्रत्यक्ष कर रिफंड आणि सीमाशुल्क परताव्याच्या दाव्यांचे लवकरच निराकरण करण्यासाठी एक मोहीम राबविली आहे, जी या महिन्याच्या अखेरीस सुरु केली जाईल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने सीबीआयआयसीने यासंदर्भात कस्टम व केंद्रीय कर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्तांना गुरुवारी पत्र लिहिले आहे.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना विशेषत: युनिटला त्वरित दिलासा मिळावा, असे निर्देश या पत्रात देण्यात आले आहेत. रिफंड आणि ड्रॉ बॅंक नावाने ही मोहीम या महिन्याच्या अखेरीस राबविली जाईल. त्याचबरोबर निर्यातदारांना मदत करण्यासाठी अर्जदाराच्या उपलब्ध ईमेल आयडीवर सर्व पत्रव्यवहार करण्यास सांगितले आहे.

कर आणि सीमा शुल्क परतावा योजनेंतर्गत 18,000 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित असल्याचे मानले जात आहे. वित्त मंत्रालयाने यापूर्वी बुधवारी म्हटले होते की, कोविड -19 पासून दिलासा देण्यासाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि सीमाशुल्कांचे सर्व परतावे देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा एमएसएमईसह सुमारे एक लाख लघु उद्योजकांना होणार आहे.