खुशखबर ! ‘ही’ कंपनी 30000 लोकांना देणार नोकरी, सणांची मागणी पूर्ण करण्यासाठी निर्णय

नवी दिल्ली : वृत्त संस्था – वस्तूंच्या डिलिव्हरीसह ‘लॉजिस्टिक’ सुविधा उपलब्ध करून देणारी ईकॉम एक्सप्रेस पुढील काही आठवड्यात 30,000 लोकांना सणासुदीच्या काळासाठी रोजगार देण्याची योजना बनवत आहे. कंपनीनुसार हे रोजगार तात्पुरते असतील. कंपनी ई-कॉमर्स कंपन्यांकडून सणांच्या दरम्यान वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी नव्या लोकांना नियुक्त करण्याचा विचार करत आहे.

कोविड-19 पूर्वी कंपनीच्या कर्मचार्‍यांची संख्या सुमारे 23,000 होती. कंपनीने ‘लॉकडाऊन’मध्ये आणि त्यानंतर वाढत्या ‘ऑनलाइन’आर्डर पूर्ण करण्यासाठी मागील काही महिन्यात 7,500 कर्मचार्‍यांना नियुक्त केले. लोक कोविड-19 च्या दरम्यान किराणा सामान, औषधे आणि अन्य वस्तूंसाठी ई-कॉमर्सकडे वळत आहेत.

ईकॉम एक्सप्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य एचआर अधिकारी सौरभ दीप सिंगला यांनी म्हटले, महामारीने ई-कॉमर्स उद्योगांना एका वेगळ्या ठिकाणी पोहचवले आहे. सणांच्या दरम्यान आमचे ई-कॉमर्स ग्राहक खुप आक्रमक योजना तयार करत आहेत आणि आम्ही हे निश्चित करत आहोत की, त्यांची मागणी पूर्ण केली जावी. आम्ही नियुक्त्या सुरू केल्या आहेत. ही प्रक्रिया 10 ऑक्टोबरपर्यंत जारी राहील आणि आम्ही सणांच्या दरम्यान 30,000 अस्थायी रोजगार निर्माण करण्याची अपेक्षा करत आहोत.

कंपनीची मनुष्यबळ संख्या ऑगस्टमध्ये 30,500 होते. त्यांनी म्हटले, मागच्या वर्षी आम्ही सणांच्या पूर्वी 20,000 लोकांना नियुक्त केले होते. मात्र हे रोजगार तात्पुरते होते, परंतु यातून सुमारे एक तृतीयांश कायम झाले आहेत, कारण सणांच्यानंतर सुद्धा ऑर्डरमध्ये वाढ दिसत होती.

ई-कॉमर्स कंपन्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या व्यवसायाचा मोठा भाग सणांच्या दरम्यान येईल आणि त्यांनी क्षमता वाढवण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे, जेणेकरून ऑर्डरचे चांगले व्यवस्थापन करता येईल. वालमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्टने पुरवठा व्यवस्था मजबूत करणे आणि डिलिव्हरी क्षमता वाढवण्यासाठी नुकतेख 50,000 पेक्षा जास्त किराणा दुकांनांना जोडले आहे.

तर, अमेझॉन इंडियाने पोच केंद्र (विशाखापट्टमणम, फरूखनगर, मुंबई, बेंगळुरू आणि अहमदाबाद) जोडण्याची घोषणा केली. सोबतच सध्याच्या आठ केंद्रांच्या विस्ताराची घोषणा केली आहे. सिंगला म्हणाले, ईकॉम एक्सप्रेस ज्या नियुक्त्या करेल, त्या महानगरांशिवाय छोट्या शहरांमध्ये सुद्धा असतील. कंपनी देशातील दुर्गम क्षेत्रात सुद्धा सामानाची डिलिव्हरी करण्याबाबत विचार करत आहे, ज्यासाठी डिलिव्हरी छोट्या आणि मध्ये शहरांमध्ये सुद्धा केली जाईल.