‘इनकम टॅक्स’ रिटर्न फाइल केल्यानंतर ‘असा’ मिळणार ‘रिफंड’, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम : इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) त्याच करदात्यांना लागू होतो ज्यांनी ते दाखल केले आहे. तुम्ही जर आर्थिक वर्ष २०१८- १९ च इनकम टॅक्स रिटर्न फाईल केला असेल तर रिफंड (परतावा) ची प्रक्रिया पुर्ण झाली आहे की नाही, याबाबत जाणून घेणही आवश्यक आहे. परताव्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते, हे देखील माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही दाखल केलेल्या आयटीआरची आयकर विभागाकडून तपासणी केली जाते, यानंतर दिलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला रिफंड मिळणार असेल तर ते तुमच्या खासगी बँक खात्यात जमा केलं जातं.

तुम्हाला परतावा मिळणार की नाही यासाठी
१.
सर्वात आधी इनकम टॅक्स ई- फायलिंग वेबसाइटला भेट द्या. पोर्टल लॉग इन करा. यानंतर तुमचा पॅन क्रमांक, ई-फायलिंग पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरावा लागेल.
२. तुमचं प्रोफाइलच पेज सुरु झाल्यानंतर View returns/forms वर क्लिक करा.
३. ड्रॉप डाउन मेन्यूमधून Income Tax Returns वर क्लिक करून आपली आवश्यक ती माहिती भरा. हायपरलिंक अकनॉलेजमेंट नंबरवर क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन दिसेल.
४. यावर तुम्हाला ITR फायलिंगचं टाइमलाइन, टॅक्स रिटर्नच्या प्रक्रियेची माहिती मिळेल. तसंच आयकर परताव्याच्या पडताळणीची तारीख, प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख, परतावा मिळण्याची तारीख आणि देय परताव्यासंदर्भातील सर्व माहिती दिली जाते.
५. जर तुमचं आयकर परतावा काही कारणास्तव फेल झाला. तर याचं कारणही तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं जातं.
६. आयटीआर भरल्यानंतर त्याची व्हेरिफिकेशन करण्याचीही गरज असते. जर व्हेरिफाय केलं नाही तर ते अधिकृत धरलं जात नाही. रिटर्न्स भरल्यानंतर आपण आधार OTP द्वारे व्हेरिफाय करुन घ्या. त्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी जोडलेला असायला हवा. तुमच्या मोबाइल नंबरवर OTP आल्यानंतर तो इनकम टॅक्सच्या वेबसाइटवर टाका. त्यानंतर तुमचे रिटर्न्स व्हेरिफायची प्रक्रिया पुर्ण होईल. याशिवाय तुम्ही बँकेचं ATM, DMAT अकाउंट आणि नेट बँकिंगच्या माध्यमातूनही ITR व्हेरिफाय करू शकता. तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर ITR भरणं आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्पन्नाची मर्यादा ३ लाख आणि ८० पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ५ लाख रुपये आहे.

You might also like