50 हजार ‘गुंतवा’ अन् वर्षाला 2.5 लाख ‘कमवा’, सुरू करा ‘या’ ची शेती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही व्यवसाय करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा व्यवसाय फायदेशीर ठरु शकतो. शेती करणं तुम्हाला आवडत असेल तर असे उत्पादन घ्या जे कमी गुंतवणूकीत जास्त कमाईची गारंटी देऊ शकेल. जसे की बटन मशरुम. या मशरुमची रेस्टारंट, हॉटेलमध्ये मोठी मागणी असते. बटन मशरुमध्ये मिनरल्स आणि विटामिनचे प्रमाण भरपूर आहे. यामुळे मशरुम लोकप्रिय आहे. बाजारात याचे दर 300 ते 500 रुपये किलो आहे आणि होलसेल बाजारात हा दर 40 टक्के कमी आहे. त्यामुळे पारंपारिक शेती सोडून हा व्यवसाय करणे फायदेशीर ठरु शकते.

50 हजार रुपयांची गुंतवणूक आणि 2.50 लाख रुपयांची कमाई –
बटन मशरुम शेतीसाठी कम्पोस्ट केले जाते. एक क्विंटल कम्पोस्टसाठी दीड किलो बियाणे लागतात. 4 ते 5 क्विंटल कम्पोस्ट बनवून जवळपास 2 हजार किलो मशरुम उगवता येतात. 2 हजार किलो मशरुम 150 रुपये किलोने विकल्यास जवळपास 3 लाखाचे उत्पन्न येईल. त्यातून 50 हजार रुपये पहिल्यांदा लागणारी गुंतवणूक असेल जे काढून घेतल्यास 2.50 लाख रुपये जमा होतील. परंतु यासाठी लागणारी रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.

कमी जागेत व्यवसाय सुरु –
प्रति स्वेअर मीटरमध्ये 10 किलोग्रॅम मशरुम सहज उगवला जाऊ शकतो. कमीत कमी 40×30 फुटाच्या जागेत तीन तीन फूट रेखा आखून मशरुम उगवले जाऊ शकते.

कम्पोस्ट बनवण्याची पद्धत –
कम्पोस्ट बनवण्यासाठी धान्याच्या पेंढ्या भिजवाव्या लागतील. एक दिवसानंतर डीएपी, युरिया, पोटैशियम, गव्हाच्या पेढ्या, जिप्सम आणि कॉर्बोफ्युडोरन मिसळून हे सडण्यासाठी सोडावे लागेल. दीड महिन्यानंतर याचे कम्पोस्ट तयार होईल. त्यानंतर शेणखत आणि माती मिसळून दीड इंचाची परत तयार करुन त्यावर कंपोस्टची 2 – 3 इंचांची परत टाकावी लागेल. यातील ओलावा कायम ठेवावा लागेल, यासाठी मशरुमवर स्प्रे करावा लागेल. हा स्प्रे दोन तीन वेळा करावा लागेल. यावर 1 – 2 इंचाची परत पुन्हा टाकावी लागेल आणि या पद्धतीने मशरुम उगवता येतील.

मशरुम शेतीचे प्रशिक्षण घेऊन करा सुरुवात –
सर्व शेतकी विद्यापीठात आणि कृषि संशोधन केंद्रात मशरुमच्या शेतीचे प्रशिक्षण देण्यात येते. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात शेती करणार असाल तर हे योग्य ठरेल की त्यांचे प्रशिक्षण घ्या.