SBI Alert : खात्यात लवकर अपडेट करा PAN डिटेल्स, अन्यथा डेबिट कार्डवर नाही मिळणार ‘ही’ सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. एसबीआयने डेबिट कार्डद्वारे विना अडथळा इंटरनॅशनल ट्रांजक्शनचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांना आपला पॅन नंबर अपडेट करण्यास सांगितले आहे. एसबीआयने सोशल मीडियाद्वारे आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत म्हटले, इंटरनॅशनल ट्रांजक्शनमध्ये समस्या येत आहे? एसबीआय डेबिट कार्डद्वारे विना अडथळा परदेशी व्यवहारांचा आनंद घेण्यासाठी बँकेच्या रेकॉर्डमध्ये पॅन डिटेल अपडेट करा.

तसेच, असे न केल्यास एसबीआय ग्राहक एटीएम, पीओएस/ई-कॉमर्सवर इंटरनॅशनल ट्रांजक्शन करू शकणार नाहीत. सोबतच आपले पॅन एसबीआय खात्याशी ऑनलाइन किंवा बँकेच्या शाखेत जाऊन लिंक करू शकता. बँकेनुसार तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे बँक खात्याशी पॅन अपडेट करू शकता. मागच्या वर्षी इंटरनॅशनल ट्रांजक्शनच्या नियमांबाबत सरकारने काही बदल केले होते.

ऑनलाइन पद्धतीने असे एसबीआय खात्यातून पॅन करा लिंक
आपल्या खात्यातून ऑनलाइन पॅन लिंक करण्यासाठी सर्वप्रथम एसबीआय इंटरनेट बँकिंगमध्ये लॉगइन करा.
यानंतर ई-सर्व्हिस टॅबवर जाऊन पॅन रजिस्ट्रेशन ऑपशनवर क्लिक करा.
येथे आपला प्राफाईल पासवर्ड टाका आणि सबमिटवर क्लिक करा. येथे तुमची सर्व अकाऊंट दिसतील.
ज्या अकाऊंटमध्ये पॅन रजिस्टर्ड नसेल, त्याच्या समोर क्लिक हिअर टू रजिस्टर लिहिलेले असेल.
तुम्हाला ज्या अकाऊंटमध्ये पॅन रजिस्टर्ड करायचे आहे त्यावर क्लिक करा. यानंतर पुढील पेज ओपन होईल, येथे तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचे आहे.
यानंतर स्क्रीनवर तुमचे नाव, सीआयएफ आणि पॅन नंबर येईल यास चेक करून कन्फर्मवर क्लिक करा.
ट्रांजक्शन अकाऊंट सीलेक्ट करा आणि आपल्या पॅन डिटेल्स भरून सबमिट करा.
कन्फर्मवर क्लिक करताच नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक हाय सिक्युरिटी पासवर्ड येईल तो टाकून कन्फर्मवर क्लिक करा.
यानंतर तुमच्या स्क्रीनवर पॅन लिंक करण्याची रिक्वेस्ट सबमिट झाल्याचा मॅसेज येईल.
पॅन एसबीआय बँक खात्याशी जोडण्यासाठीची तुमची विनंती तुमच्या बँकेच्या शाखेला पाठवली जाईल.
तुमच्या रिक्वेस्टनंतर बँकेद्वारे 7 दिवसात प्रोसेस केली जाईल.
एकदा जेव्हा तुमचे पॅन खात्याशी लिंक होईल, तेव्हा बँक तुम्हाला एसएमएस पाठवून कन्फर्म करेल.

ऑफलाईन रजिस्ट्रेशनसाठी ब्रँचमध्ये जाऊन असे करा पॅन लिंक
जर तुम्ही ऑफलाइन मोडद्वारे आपल्या एसबीआय बँक खात्यासोबत आपले पॅन लिंक करायचे असे तर तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. येथे यासाठी फॉर्म भरून त्यासोबत पॅन कार्डची फोटो कॉपी सबमिट करावी लागेल.

पॅन कार्डची ओरिजनल कॉपी सुद्धा सोबत घेऊन जा, कारण बँक अधिकारी सत्यता पडताळणी करू शकतात. बँकेद्वारे पडताळणी केल्यानंतर त्याबाबत नोंदणीकृत मोबाइल नंबरवर बँकेतून एसएमएस प्राप्त होईल. ज्यामध्ये पॅन लिंक करण्याची तुमची रिक्वेस्ट सबमिट होण्याबाबत सांगितले जाईल.