कडक लॉकडाऊनमध्ये शेगावच्या हॉटेलमध्ये सुरू होता भलताच धंद्या, पर्दाफाश झाल्यानंतर तिघे गोत्यात

शेगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकाडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करुन हॉटेलमध्ये सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी हॉटलमध्ये छापा टाकून एका युवतीसह एका ग्राहकाला आणि हॉटेल मॅनेजरला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दलालांकडून पाठवण्यात आलेल्या कॉल गर्लच्या माध्यमातून शेगावातील लॉजवर देहविक्री सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने बाळापूर रोडवरील हॉटेलमध्ये छापा टाकला. त्यावेळी दोन जण आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. ही कारवाई शनिवारी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान करण्यात आली.

पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापक प्रवीण लक्ष्मण तायडे (वय-23 रा. शेगाव) आणि कुलदीप शिवाजी भाकरे (वय-30 रा. मोरगाव भाकरे, जि. अकोला) या दोघांना अटक केली आहे. कोलकाता येथील एक युवती मागील पाच दिवसांपासून याच हॉटेलमध्ये रहात असून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4 हजार 400 रूपये रोख आणि इतर आक्षेपार्ह वस्तू असा एकूण 4 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीला न्यायालयात हजर करुन तिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.