अबब ! साडेतीन लाखांचा मास्क, ‘त्या’ व्यावसायिकाने घेतली मराठी माणसाकडून प्रेरणा

पोलीसनामा ऑनलाईन – ओदिशामधील एका गोल्डमॅनने देखील सोन्याचा मास्क तयार केला असून हा गोल्डमॅन ओदिशातील कटक इथला आहे. कटकमधल्या या एका व्यावसायिकाने सोन्याचा मास्क तयार केला असून त्याची किंमत सुमारे साडेतीन लाख इतकी आहे.

मी चाळीस वर्षांपासून सोने वापरतो. मला कटमध्ये गोल्डमॅन ओळखले जात आहे. हा गोल्ड मास्क एका मराठी माणसाच्या प्रेरणेने तयार केला. त्यामुळे मी त्याच्याच पाठोपाठ गोल्ड मास्क म्हणजेच सोन्याचा मास्क तयार करून तो वापरत आहे, असे त्या व्यापाऱ्याने सांगितले. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

चर्चा शंकर कुऱ्हाडे यांच्या मास्कची
पुण्यातील पिंपरीमधल्या शंकर कुऱ्हाडे या गोल्ड मॅनने काही दिवसांपूर्वीच सोन्याचा मास्क तयार केला होता. याची किंमत सुमारे ३ लाखांच्या घरात आहे. हा मास्क कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी शंकर कुऱ्हाडे वापरताहेत. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन कटकमधल्या व्यावसायिकाने सोन्याचा मास्क तयार केला आहे.