‘जून अखेरपर्यंत कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या 15 -20 हजारांपर्यंत येईल’ – सरकारी समितीचे सदस्य डॉ. एम. विद्यासागर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोनाने थैमान घातले आहे. सध्या देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटत असली तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान रुग्णांची दैनंदिन संख्या जून अखेरीस 15 ते 20 हजारांपर्यंत येऊ शकते, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. सध्या हा आकडा 3 लाखांच्या जवळपास आहे. कोरोनाची तिसरी लाट 6 ते 8 महिन्यात येऊ शकते, असे सरकारी समितीच्या सदस्याने सांगितले आहे. तसेच जर पुरेशा संख्येने कोरोना लसीकरण झाल्यास कोरोना नियंत्रणात येईल, असे सरकारी समितीचे सदस्य डॉ. एम. विद्यासागर म्हणाले.

आयआयटी हैदराबाद येथील डॉ. एम. विद्यासागर हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य आहेत. त्यांनी गणित मॉडेलच्या आधारावर कोरोना प्रकरणांचे मॅपिंग केले आहे. यावेळी देशात कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहीमेचा वेग वाढविण्याची गरज आहे. लोकांनी नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली. परंतु पहिल्या लाटेत कोरोनाविरोधात इम्युनिटी निर्माण झाली होती. त्यातही प्रतिकारशक्ती कमी झाल्याचे डॉ. विद्यासागर यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. तसेच अलीकडील वैज्ञानिक अभ्यासानुसार असे संकेत मिळत आहेत की, ज्या लोकांमध्ये इम्युनिटी तयार होत आहे. ती 6 ते 8 महिन्यांत गायब होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत 30 टक्के अधिक रुग्ण येत आहेत. त्यांची प्रतिकारशक्ती 6-8 महिन्यांत निघून जाईल. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसीकरणावर भर देणे आवश्यक असल्याचे डॉ. विद्यासागर म्हणाले.