Cabinet Expansion | ‘शिंदे सरकार’चा मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशी आधीच, 8-10 मंत्री शपथ घेणार !; ठाणे जिल्ह्याला तब्बल 4 मंत्रीपदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy CM Devendra Fadnavis) शपथ घेऊन एक आठवडा झाला आहे. पण अजूनही इतर मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) आधीच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रविवारी आषाढी एकादशी असल्याने एकनाथ शिंदे पंढरपूरला शासकीय पुजेसाठी जाणार आहेत, त्याआधी म्हणजे शुक्रवारी किंवा शनिवारी नवे मंत्री शपथ घेतील.

 

पहिल्या टप्प्यामध्ये 8 ते 10 मंत्र्यांच्या शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांचा समावेश असेल. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) महत्त्वाची चर्चा होणार आहे. राजभवनातील (Raj Bhavan) दरबार हॉलमध्ये (Durbar Hall) शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

 

ठाणे जिल्ह्याला 4 मंत्रीपदे

नव्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्याला जास्त मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्याला तब्बल 4 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
यामध्ये मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पालकमंत्रीपद भूषवणारे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan),
यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे.
तर शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक (Shivsena rebel MLAs Pratap Saranaik)
आणि बालाजी किणीकर (Balaji Kinikar) यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याशिवाय महामंडळात देखील ठाणे जिल्ह्यातील अनेक आमदारांची वर्णी लागणार असल्याची माहिती आहे.

 

Web Title :- Cabinet Expansion | maharashtra em eknath shinde devendra fadnavis government cabinet to get new ministers before ashadhi ekadashi 10 ministers likely to take oath

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा