कॅल्शियम कमी आहे ? ‘हे’ उपाय करा आणि कमतरता भरून काढा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – शरीरासाठी कॅल्शियम खूप जरूरी आहे. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास अनेक त्रास होऊ शकतात. यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते. कॅल्शियम शरीरात योग्य प्रमाणात असल्यास दात आणि हाडेदेखील मजबूत राहतात. अनेक पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. केवळ हे पदार्थ ओळखून त्यांचे नियमितपणे सेवन केले पाहिजे. नैसर्गिकरित्या कॅल्शियम मिळणारे पदार्थ कोणते, हे जाणून घेवूयात.

वयानुसार शरीराला कॅल्शियमची आवश्यकता असते. १ ते ८ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ५०० ते ८०० मि.ग्रॅम, वयस्करांसाठी (५० वर्षापर्यंत वय) १००० मि.ग्रॅम, ५१ च्या वर वय असलेल्या लोकांसाठी १२०० मि.ग्रॅम कॅल्शियमची गरज असते.

या पदार्थांमध्ये आहे भरपूर कॅल्शियम

दुध : दुधामध्ये कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते. एक ग्लास दुधामधून शरीराला २४० मि.ग्रॅम कॅल्शियम मिळते.

लिंबू : नियमितपणे लिंबूपाणी घेतल्यास कॅल्शियम कमतरता नाहीशी होते. एक कप लिंबूपाण्यात ५५ मि.ग्रॅम कॅल्शियम असते.

केळी : केळी खाल्ल्याने शरीराला आवश्यक तेवढे कॅल्शियम मिळते. एका केळ्यात ६ मि.ग्रॅम कॅल्शियम असते.

पनीर : पनीर खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता दूर केली जाऊ शकते. एक कप पनीरमध्ये १३० मि.ग्रॅम कॅल्शियम असते.

सोयाबिन : सोयाबिनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. एक कप सोयाबिनमध्ये २०० मि.ग्रॅम कॅल्शियम असते.

बिन्स : बिन्स खाल्ल्याने प्रोटीन्स आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. ९० ग्रॅम बिन्समध्ये ५० मि.ग्रॅम कॅल्शियम असते.

गाजर : गाजरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. १२० ग्रॅम गाजरमध्ये ३६ मि.ग्रॅम कॅल्शियम असते.

दही : आहारात नियमित दही घेतले. तर कॅल्शियमची कमतरता दूर होते. एक कप दह्यात ४०० मि.ग्रॅम कॅल्शियम असते.

गुळ : गुळाचा आहारात समावेश केल्यास भरपूर प्रमाणात फॉस्फरस आणि कॅल्शियम मिळते. एक कप गुळात ८० मि.ग्रॅम कॅल्शियम असते.

भाज्या : म्हणजे पालक, पत्ताकोबी, फुलकोबी, मेथी या मधून भरपूर कॅल्शियम मिळते. १२० ग्रॅम पालेभाज्यांमध्ये ११२ मि.ग्रॅम कॅल्शियम मिळते.

आरोग्य विषयक वृत्त –

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

हे दोन पदार्थ टाळा ; अन्यथा ‘स्नायू’ होतील कमजोर

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका