बिबट्याच्या हल्ल्यात बछड्याचा मृत्यू, शिरुर तालुक्यातील धामारी येथील घटना

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील धामारी येथील गंगासागर तलाव वस्ती येथे नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला असल्याची घटना पाच फेब्रुवारीच्या रात्रीच्या सुमारास घडली .याबाबत शिरूर वनविभागाने पंचनामा करत मृत बछड्याचा पंचनामा करून ताब्यात घेत त्याचे दहन केल्याची माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली

धामारी ता. शिरूर येथील गंगासागर तलाव वस्ती येथे रस्त्याचे कडेला एक बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळाली, त्यांनतर शिरूर वनविभागाच्या वनपाल चारुशिला काटे, प्रवीण क्षिरसागर, वनरक्षक ऋषिकेश लाड, अभिजित सातपुते, वनमजूर हनुमंत कारकुड, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शेरखान शेख, श्रिकांत भाडळे, कात्रज उद्यान रेस्क्यू टीमचे रमेश हरिहर यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली असता त्या ठिकाणी अंदाजे सहा ते सात महिने वयाचा नर जातीच्या बिबट्याचा बछाडा मृत अवस्थेत पडला असल्याचे आढळून आले, यावेळी वनविभागाच्या वतीने त्या ठिकाणी पाहणी करत पंचनामा केला असता त्या ठिकाणी मोठ्या बिबट्यांच्या तसेच लहान बछड्यांच्या पायाचे देखील ठसे आढळून आले, यावेळी वनविभागाने मृत बिबट्याचा ताब्यात घेतले, यावेळी धामारीचे पोलीस पाटील आत्माराम डफळ, माजी सरपंच कैलास डफळ, माजी चेअरमन गुलाब डफळ, विकास निर्मळ, रामदास शिंदे यांसह आदी उपस्थित होते, यावेळी वनविभागाच्या वतीने नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, जनावरांच्या शेजारी निवारा करावा, रात्रीच्या वेळेस लाईट चा वापर करावा, शेतात जाताना खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे, तर मृत बिबट्याच्या बछड्याचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू झाला असून मृत बछड्याला शिरूर येथे घेऊन जाऊन त्याचे अग्नीदहन करण्यात आले असल्याचे शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.