मुंबई विमानतळावर फोन करून युवक बोलला ‘बॉम्बे’, अधिकार्‍यानं ऐकलं ‘बॉम्ब’ आणि त्यानंतर सगळीच ‘बोंबाबोंब’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई विमानतळावरील नियंत्रण कक्षाला एका युवकाच्या आलेल्या फोनमुळे चांगलाच गोंधळ उडाला. एका युवकाने विमानतळावरील नियंत्रण कक्षाला फोनवरून बॉंबे असे म्हंटले पण ऐकणाऱ्या अधिकाऱ्याला बॉंब असे ऐकू आले. या गैरसमजामुळे विमानतळावर गोंधळ उडाला.

नोकरीच्या शोधात असलेल्या हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याने मुंबई विमानतळावर नोकरीविषयी विचारणा करण्यासाठी फोन केला. फोन थेट विमानतळावरील नियंत्रण कक्षाकडे गेला. नियंत्रण कक्षात उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्याने फोन उचलला तेव्हा विद्यार्थ्याने विचारले, ‘बॉम्बे एयरपोर्ट? पण अधिकाऱ्याने ऐकले बॉम्ब है एयरपोर्ट पर’. नियंत्रण कक्षाला वाटले की, कोणीतरी विमानतळावर बॉंब असल्याची माहिती देत आहे. यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला. पूर्ण विमानतळावर स्निफर डॉग्ज तैनात केले.

यानंतर अधिकाऱ्यांनी माहितीची खातरजमा करण्यासाठी माहिती देणाऱ्या युवकाला फोन केला. तेव्हा त्याने म्हंटले की, मी तर जॉब वॅकन्सी विचारण्यासाठी कॉल केला होता. त्याला कोठून तरी माहिती मिळाली होती की मुंबई विमानतळावर जॉब आहे. यानंतर गोंधळून गेलेल्या अधिकाऱ्यांच्या जीवात जीव आला. ही घटना १९ जुलैला घडली.

आरोग्यविषयक वृत्त –