सनबर्न फेस्टिवल रदद् करा… पालकमंत्री गिरीष बापट यांना घेराव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा या मागणीसाठी पुणे शहर दहीहंडी व गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने वतीने अॅड .राहुल म्हस्के , गिरीश गुरनानी, अनुप भाऊ मारणे, संतोष शिंदे आणि कार्यकर्ते यांनी पालकमंत्री गिरीष बापट यांना घेराव घातला. यावेळी येत्या २९ ते ३१ तारखेला मुळशी येथे होणाऱ्या सनबर्न फेस्टिवल रद्द करण्याबाबत गिरीश बापट यांना निवेदन देण्यात आले.
सनबर्न फेस्टिव्हल’ला वेळेची मर्यादा नसते. मात्र शिवजयंती, दहिहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव काळात कायद्याचा बडगा दाखवून रात्री १० वा. बंद केले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलला आर्थिक गणिते बघून रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते. सनबर्न फेस्टिव्हल मध्ये रात्रभर अमली पदार्थाचे प्रचंड सेवन व वापर होत असतो. यामुळे तरूण पिढीवर प्रचंड वाईट परिणाम होतात. या वाईट संस्कृतीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. रात्रभर तरूण मुले मुली मद्यपान  व आमली पदार्थाचे सेवन करतात असे समितीचे म्हणणे आहे.
यापूर्वीच समितीच्या वतीने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनादेखील ‘सनबर्न’ रद्द करण्याबाबत निवेदन दिले होते. तावडे यांनी सनबर्न रद्द करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते. त्यानंतर आता पालकमंत्री यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.