Captain Amarinder Singh Resigns | पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

दिल्ली : वृत्तसंस्था –  पंजाब काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरु शकतो. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) बैठकीपुर्वी मुख्यमंत्री (CM) पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. काँग्रेस नेतृत्वाकडून कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांना राजीनामा (resignation) देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीअगोदरच काँग्रेस (Congress) पक्षात अंतर्गत घमासान सुरु आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आज काँग्रेसच्या विधिमंडळ दलाच्या बैठकीपूर्वीच राजीनामा दिला आहे. आज सायंकाळी वाजता मुख्यमंत्री अमरिंदर सिंह एक पत्रकार परिषद घेणार आहेत.
अशी माहिती त्यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल (Ravin Thukral) यांनी दिली आहे.

दरम्यान, पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद चांगलाच भडकला आहे.
आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही,
असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी
(Sonia Gandhi) यांना दिला. अमरिंदर सिंह यांची खदखद बाहेर पडली असून त्यांनी आता
‘आर या पार’ अशी भूमिका घेतली आहे.

 

Web Title : Captain Amarinder Singh Resigns | Punjab CM Captain Amarinder Singh submits resignation to Governor Banwarilal Purohit, at Raj Bhavan in Chandigarh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gravittus Foundation | ‘ग्रॅव्हिटस फाउंडेशन’द्वारे ट्रान्सजेंडर्ससाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम; देशातील पहिला प्रकल्प पुण्यात सुरू

Pune Cantonment | पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची मोठी कारवाई ! पुलगेट परिसरातील दिल्ली दरबार, सुजाता मस्तानी, शेगाव कचोरी ‘सील’ बंद, जाणून घ्या प्रकरण

Maharashtra Political News | देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास, नव्या समीकरणांचे संकेत?