आता ‘एक देश, एक ड्रायव्हिंग लायसन्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार लवकरच पूर्ण देशामध्ये ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरु करणार आहे. म्हणजे पूर्ण भारतात ड्रायव्हिंग लायसन्सचे स्वरूप, फॉन्ट आणि ले आऊट एक सारखेच असतील. पासपोर्ट आणि पॅनकार्डचे देशातील स्वरूप एकसारखेच असते. त्याच धरतीवर ड्रायव्हिंग लायन्समध्ये बदल केले जाणार आहेत. देशाच्या सर्व राज्यातील सर्व RTO द्वारे ‘युनिव्हर्सल स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसेंन्स’ लागू करण्यात येणार आहेत.

पूर्ण देशासाठी ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्याचा एक नमुना आहे, यामुळे खोट्या ड्रायव्हिंग लायसन्सवर आळा बसू शकतो. सध्या वेगवेगळ्या राज्यांच्या RTO कडून देण्यात येणारे लायसन्स वेगवेगळ्या स्वरूपातील आहे. यामुळे ट्राफिक पोलीस अधिकाऱ्यांना आणि मोटार वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांना वाहनांची नियमित तपासणी करताना ड्रायव्हिंग लायसन्सची सत्यता तपासणे अवघड जाते.

याशिवाय, ड्रायव्हिंग लायसन्सच्या डुप्लिकेट कॉपी तयार करण्याचा देखील भीती असते. ड्रायव्हिंग लायसन्सला आधारकार्ड लिंकिंग अनिवार्य करण्याचा विचार सरकार करत आहे. यामुळे खोट्या, डुप्लिकेट लायसन्सवर आळा बसेल. रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ड्रायव्हिंग लायससन्सच्या युनिव्हर्सल स्वरूपाविषयी माहिती दिली.

केंद्र सरकारने मोटार वाहन संशोधन विधेयकाला मंजुरी दिली आहे. या विधेयकामध्ये ड्रायव्हिंग लायसन्सला आधार-लिंकिंग अनिवार्य करण्याची तरतूद केली आहे.

 

माझी उत्तराधिकारी महिला असू शकेल, परंतु ती आकर्षक असायला हवी : दलाई लामा

मराठा आरक्षण झाले आता धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण हेच ध्येय : सुनिता गडा

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

‘किकबॉक्सिंग’ने घालवा राग आणि तणाव