अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात फसवणुकीचा FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात उत्तर प्रदेशच्या कटघर पोलीस ठाण्यात  आयपीसीमधील कलम ४२० (फसवणूक) आणि कलम ४०६ नुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सोनाक्षीला १३ सप्टेंबर २०१८ रोजी एक स्टेज शो परफॉर्मंस करायचा होता. सोनाक्षीवर आरोप आहेत की, तिला २४ लाख रुपयेदेखील देण्यात आले होते. परंतु सोनाक्षी या इव्हेंटला आलीच नाही. यानंतर उत्तर प्रदेशात सोनाक्षीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस या केससंदर्भात सोनाक्षीची जबाणी घेण्यासाठी मुंबईला आले आहेत. असे समजत आहे की, जेव्हा पोलीस सोनाक्षी सिन्हाच्या घरी पोहोचले तेव्हा ती तिथे नव्हती. त्यामुळे पोलीस तेथून परतले. यानंतर मोरादाबाद पोलिसांची टीम आता मुंबईत सोनाक्षी सिन्हाच्या जबाणीसाठी वाट पहात आहेत. सोनाक्षी सिन्हाच्या मॅनेजमेंटचं म्हणणं आहे की, सोनाक्षीविरोधात लावण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. हे सगळं तिची प्रतिमा मलीन करण्यासाठी केलं जात आहे.

सोनाक्षीच्या सिनेमांबद्दल सांगायचे झाले तर, ती कलंक या सिनेमात शेवटची दिसली होती. सध्या सोनाक्षी तिचा आगामी सिनेमा खानदानी शफाखाना मुळेही चर्चेत आहे.  सोनाक्षी सिन्हाचा खानदानी शफाखाना हा सिनेमा २ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. पंजाबच्या बॅकग्राऊंडवर आधारीत या सिनेमाची स्टोरी असणार आहे. या सिनेमात सोनाक्षी सेक्स क्लिनिक चालवताना दिसणार आहे. सोनाक्षी म्हणते की, “माझ्या समाजात सेक्सला टॅब्यू मानलं जातं. यावर कधीच खुलेआम बोललं जात नाही. या सिनेमात याच मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे.”  याशिवाय सोनाक्षी लवकरच सलमान खानच्या दबंग सिनेमात झळकणार आहे.