Maharashtra Rain Update | राज्यात आजही जोरदार पावसाचा इशारा; पुण्यासह सातारा, कोकण, रायगड आणि रत्नागिरीला ‘रेड अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | राज्यात मागील काही दिवसापासून पावसाने (Maharashtra Rain Update) चांगलाच जोर धरला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह (Western Maharashtra) कोकण (Konkan), मराठवाडा (Marathwad) आणि विदर्भात (Vidarbha) पावसाने धुमाकूळ घातला. राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई (Mumbai) उपनगरासह ठाणे (Thane), पालघर (Palghar) या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. आज (बुधवार) पुणे (Pune) आणि सातारा (Satara) जिल्ह्यात रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार, आजही राज्याच्या (Maharashtra Rain Update) विविध भागात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. धरण परिसरात सुरु असलेल्या पावसाने धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. खडकवासला (Khadakwasla) धरणातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या (Mutha River) पात्रात सुरू करण्यात आला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारी धरणांच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

मुंबईसह ठाणे परिसरात मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. या पावसामुळे काही भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. मुंबईच्या अंधेरी सबवे खाली पाणी भरल्यामुळे अंधेरी बंद करण्यात आला. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला त्या परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून (Administration) करण्यात आले आहे.

हवामान खात्याचा अंदाज काय?

रेड अलर्ट (Red Alert) –

  • पुणे
  • सातारा
  • कोकण
  • रायगड
  • रत्नागिरी

ऑरेंज अलर्ट (Orange Alert) –

  • सिंधुदुर्ग
  • कोल्हापूर
  • ठाणे
  • पालघर
  • मुंबई
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • नांदेड

यलो अलर्ट (Yellow Alert) –

  • मराठवाडा
  • विदर्भ
  • उत्तर महाराष्ट्र

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर