CBDT Chairman on Taxpayers | टॅक्‍सपेयर्सबाबत सीबीडीटी चेअरमनचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ७० टक्के करदाते…

नवी दिल्ली : CBDT Chairman on Taxpayers | केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) चे अध्यक्ष नितीन गुप्ता (Nitin Gupta) यांनी सांगितले की सुमारे ७०% करदात्यांनी नवीन कर प्रणालीकडे वळणे अपेक्षित आहे. २०२४ या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) नवीन कर प्रणालीबाबत घोषणा करण्यात आली. ते म्हणाले की सुमारे ६०% कॉर्पोरेट इन्कम आधीपासूनच लो टॅक्स र‍िजीमच्या अंतर्गत येते. गुप्ता (CBDT Chairman on Taxpayers) म्हणाले, चालू आर्थिक वर्षात, रिफंड मिळाल्यानंतर, ९ ऑक्टोबरपर्यंत डायरेक्ट टॅक्स कलेक्शन ९.५७ टिड्ढलियन रुपये होते. हे मागील वर्षीच्या निव्वळ कलेक्शनपेक्षा २१.८% अधिक होते (New Tax Regime).

५३ लाख नवीन करदात्यांनी भरला रिटर्न
रिफंडपूर्वी टॅक्स अ‍ॅथोरिटीने आतापर्यंत ११.०७ टिड्ढलियन रुपये जमा केले आहेत. जे एका वर्षापूर्वी जमा झालेल्या पैशांपेक्षा १८% जास्त आहे. ते म्हणाले की, यावर्षी जुलैपर्यंत सुमारे ५३ लाख नवीन करदात्यांनी टॅक्स रिटर्न दाखल केला आहे. ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर लावलेल्या कराद्वारे या वर्षी ६०० कोटी रुपये टीडीएस जमा झाला आहे.

६०-७०% करदाते नवीन कर प्रणालीकडे वळतील
गुप्ता म्हणाले की, सुमारे ६०-७०% वैयक्तिक करदाते नवीन कर प्रणालीकडे वळतील. हे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.
ते म्हणाले की, जरी नवीन कर प्रणालीनुसार एखाद्याचा टॅक्स नियोक्त्याने कापला तरी, तो करदाता रिटर्न भरताना
जुनी अथवा नवीन कर प्रणाली पैकी एक निवडू शकतो. चेअरमन म्हणाले, कॉर्पोरेशन्स, कमी कर दर आणि विना टॅक्स
सवलतीच्या, २०१९ मध्ये लागू केलेल्या नवीन कर प्रणालीचा वापर करत आहेत. (CBDT Chairman on Taxpayers)

गुप्ता म्हणाले की, भारत जी२० देशांसोबत अघोषित परदेशी अचल मालमत्तेच्या डाटाची स्वयंचलित
देवाणघेवाण करण्यासाठी काम करत आहे. सध्याची प्रणाली आर्थिक डेटा शेअर करण्यावर अधिक केंद्रित आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Buxar Train Accident | ‘नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस’ला अपघात, ४ प्रवाशांचा मृत्यू; १०० पेक्षा जास्त जखमी, दुर्घटनेचे कारण आले समोर!