‘दाढी’ खेचताच तोतया CBI अधिकाऱ्याचे फुटले ‘बिंग’

मुजफ्फरनगर : वृत्तसंस्था – केंद्रीय गुप्तचर खात्याचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाच्या घरावर दोन कॉन्स्टेबल्सच्या मदतीने छापा टाकला. घराची झडती सुरु झाली़ तेव्हा आजू बाजूचे शेजारी जमले. त्यातील एकाला सीबीआय अधिकाऱ्याचा आवाज संशयास्पद वाटला. तेव्हा त्याने त्याच्या दाढीला हात लावला तर ती त्याच्या हाताच आली व त्याचे बिंग फुटले. ज्या व्यावसायिकाच्या घरावर तो छापा टाकत होता. त्यांच्याकडेच तो काही महिने कामाला होता.

या तोतया अधिकाऱ्याचे नाव त्रिविंदर कुमार (रा. मुजफ्फरनगर) आहे. बिंग फुटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडील सीबीआयची कागदपत्रे, बनावट ओळखपत्र व इतर दस्तावेज जप्त करण्यात आले.

अभिनेता अक्षय कुमारची भूमिका असलेल्या ‘स्पेशल छब्बीस’ या हिंदी चित्रपटाची या निमित्ताने आठवण आली. मुजफ्फरनगरमध्ये व्यावसायिक आदेश गोयल यांच्याकडे हा तोतया सीबीआय अधिकारी काही दिवस कामाला होता.

त्रिविंदरकुमार रात्री ८ वाजता मंडी पोलीस ठाण्यात आला. त्याने सीबीआयचे ओळखपत्र आणि व्यावसायिकाच्या घरी टाकायच्या छाप्याचा आदेश (सर्च वॉरंट) दाखवला. गोयल यांची उत्तराखंडमध्ये तांदळाची गिरणी आहे.

हा भामटा दोन पोलीस कॉन्स्टेबल्सच्या मदतीने गोयल यांच्या घरी छाप्याची कारवाई करीत असताना गोयल यांचे अनेक शेजारी जमले व त्यांनी सीबीआय अधिकाऱ्याच्या संशयास्पद वर्तनाला आक्षेपही घेतला. या भामट्याचा आवाज कोणी तरी ओळखला आणि त्याची दाढी खेचताच ती निघाली़.आता हा तोतया सीबीआय अधिकारी जेलची हवा खात आहे.

आरोग्य विषयक वृत्त

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’