CBSE 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीएसई १० वी आणि १२ वीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी एक घोषणा केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख २ फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची ही घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षांच्या तारखाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी गुरुवारी सांगितले.

यावेळी मंत्री रमेश पोखरियाल म्हणाले, CBSE १० वी आणि १२ वी परीक्षा तारखांचे पत्रक २ फेब्रुवारी २०२१ ला जारी करण्यात येईल, CBSE शाळांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करताना ही घोषणा केली आहे. तर त्यांनी यावेळी CBSE विद्यार्थ्यांना ४५ वर्षांचा रेकॉर्डसना डिजिलाइजही केले आहे. तसेच त्यांनी सीबीएसईसह अनेक शिक्षा बोर्डात नवी शिक्षा नीति लागू करण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. सीबीएससी बोर्ड या दिशेने प्रेरणादायी ठरू शकते नव्या शिक्षण नीतीचा रस्ता याच बोर्डाकडून जाईल असे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी सांगितले आहे.

शिक्षणमंत्र्यांनी वेबिनारच्या माध्यमातून १ हजारपेक्षा अधिक स्कूलच्या प्रमुखांची संवाद साधला शैक्षणिक सत्र २०२१- २२ मध्ये पाठ्यपुस्तक आणि शाळांच्या प्रक्रिया बाबत चर्चा करण्यात आली आहे. पुढे ते म्हणाले कि, नव्या शिक्षण नीतीमध्ये विद्यार्थी सहावीपासून वोकेश्नल शिक्षण मिळवतील ६ वीच्या वर्गापासूनच आपल्या करिअरची दिशा ठरवण्याची त्यांना संधी मिळेल असेही ते म्हणाले आहेत. तर १०वी आणि १२ वी विद्यार्थ्यांची परीक्षा ४ मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे.