CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु असताना कोरोनाचे संकट आल्याने काही विषयांच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र, आता या उर्वरित विषयांच्या परीक्षा होणार आहेत. सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक आज (सोमवार) जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी ट्विटवरून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परीक्षा पुढे ढकल्यात आल्या होत्या. बारावीची परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै या कालावधीत होणार आहे. यासोबतच नॉर्थ-दिल्लीत सीबीएसीईची दहावीची परीक्षा देखील याच तारखांना होणार आहे.

लॉकडाऊनमुळे सीबीएसईच्या मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षा थांबवण्यात आल्या होत्या. सीबीएसई सचिव अनुराग त्रिपाठी यांनी दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये दहावीच्या बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची घोषणा केली होती. मात्र, बारावीच्या बोर्डाची परीक्षा होणार असल्याचे म्हटलं होतं. सीबीएसईने आगदोरच जाहीर केलं होतं की, दहावीची परीक्षा होणार नाही. फक्त नॉर्थ ईस्ट दिल्लीतील विद्यार्थ्यांकरता परीक्षा आयोजित केला आहेत. सीबीएसीच्या 3 हजार शाळांना परीक्षा केंद्र बनवण्यात आले आहे. या केंद्रावरून उत्तर पत्रिका घेऊन शिक्षकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. त्यानंतर पेपर तपासण्याचं काम सुरु होणार आहे.