CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा ‘या’ महिन्यात होणार

वृत्त संस्था – कोरोना व्हायरसनं सध्या सर्वत्रच थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशभरात 24 मार्चपासुन लॉकडाऊन सुरू आहे. देशातील अनेक राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्यत वाढ होत जात आहे. केंद्र सरकार कोरोनाचा युध्दपातळीवर सामना करत आहे. दरम्यान, सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वी बोर्डाची परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा या 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

कोरोनामुळं सर्वत्र परीक्षाचे वेळापत्रक कोलमडले होते. बोर्डाच्या आणि इतर महत्वाच्या परीक्षा वगळता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पदोन्नती देण्यात आली होती. आता सीबीएसइर्ठ बोर्डानं 10 वी आणि 12 वी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा या 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.