‘कॅफे कॉफी डे’ चालू राहणार की बंद ?, कंपनीने BSEला दिलं ‘हे’ आश्‍वासन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी कॉफी चेन (कॅफे कॉफी डे) सीसीडीचे संस्थापक बेपत्ता झाले आहेत. मंगळवारी मुडिगेरे येथे असलेल्या कंपनी ऑफ कॉफी डे ग्लोबल लिमिटेडचे गेट बंद राहिले. सीसीडी चेन या कंपनीच्या अंतर्गत येते. दरम्यान कॉफी डे ग्लोबल लिमिटेडची मूळ कंपनी कॉफी डे एंटरप्राइझ लिमिटेडने कंपनीला काम थांबणार नाही, असे आश्वासन बॉंबे स्टाॅक एक्सस्चेंज शेअर बाजाराला दिले आहे.

कंपनीची सूत्रे योग्य व्यक्तींकडे

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला लिहिलेल्या पत्रात कंपनीने म्हटले आहे की, “कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना सोमवारी संध्याकाळपासून संपर्क साधू शकत नाही. अशा परिस्थितीत आम्ही संबंधित प्राधिकरणाची मदत घेत आहोत. कंपनीची योग्य देखभाल घेतली जात आहे. कंपनीची सक्षम टीम कंपनीचे नेतृत्व करत आहे.

१९ हजाराहून अधिक कर्मचारी सीसीडी चेनशी जोडलेले

११ जुलै १९९६ रोजी बेंगळुरूच्या ब्रिगेड रोड येथे कॅफे कॉफी डेचा पहिला आउटलेट सुरु झाला. २३ वर्षात, सीसीडीच्या देशभरात १७०० हून अधिक आउटलेट्स, ४८,००० वेंडिंग मशीन, ५३२ कियॉस्क आणि ४०३ ग्रॅम कॉफी विक्रीचे दुकान उघडले गेली आहेत. कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे १९,९४३ इतकी आहे. कंपनीचे सहा देशांमध्ये आउटलेट्स आहेत.

आरोग्यविषयक वृत्त