CCTV दुरुस्त करणाऱ्यानेच मोबाईलमध्ये घेतला ‘अ‍ॅक्सेस’; दाम्पत्याचे बेडरूममधील खासगी क्षण केले ‘रेकॉर्ड’ अन्…

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सीसीटीव्ही (CCTV) दुरुस्त करणाऱ्याने त्याचा अ‍ॅक्सेस (Access) आपल्या मोबाइलमध्ये घेत दिल्लीतील एका दाम्पत्याचे बेडरूम (Bedroom) मधील खासगी क्षण मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. त्यानंतर हे रेकॉर्डिंग सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रूपयांची मागणी करणाऱ्या एका टेक्नीशिअन (Technician) ला दिल्ली पोलिसां (Delhi Police) च्या सायबर सेल (Cyber Department) ने बंगळुरूमध्ये अटक (Arrest) केली आहे. रशीद (रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, दक्षिण दिल्लीमध्ये राहणारे एका दाम्पत्य नोकरीस असल्याने त्यांची मुलगी घरात एकटी राहते आणि तिची काळजी घेण्यासाठी एक मेड ठेवलेली आहे. त्यामुळे घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. मात्र, काही दिवसापूर्वी घराचा सीसीटीव्ही कॅमेरा खराब झाला. त्यासंदर्भात त्यांनी कंपनीकडे तक्रार केली. कंपनीने सीसीटीव्ही कॅमेरा ठीक करण्यासाठी एक टेक्नीशिअन पाठवला. कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी रशीद आला.

त्याने कॅमेरा ठीक करत सीसीटीव्हीचा अ‍ॅक्सेस त्याच्या मोबाइलमध्ये घेतला आणि तेथून निघून गेला. त्यानंतर काही दिवसांनंतर दाम्पत्याच्या मोबाइलवर त्यांचेच खासगी क्षणांचे (बेडरूममधील) व्हिडीओ येऊ लागले. त्याचबरोबर धमकी देत राशीदने या दाम्पत्याकडे तीन लाखाची मागणी केली अन्यथा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या दाम्पत्याने याबाबत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासास सुरुवात केली. त्यावेळी रशिदनें दिल्ली सोडल्याचे समजले.

त्यानंतर तो बंगळुरू येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाच्या पथकाने राशिदला बंगळुरूहून अटक केली. रशीद बंगळुरूला नोकरी करण्यासाठी गेला होता.
पोलिसांनी राशिदचा मोबाईल जप्त केला आहे.
त्याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना काही व्हिडीओ सापडले असून त्याची चौकशी केली जाणार आहे.
त्याच बरोबर त्याने असा प्रकार आणखी कुठे कुठे केलाय याचाही तपास करण्यात येणार आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : cctv technician blackmails delhi couple over intimate videos cyber cell of delhi police arrested him from bangalore

 

हे देखील वाचा

ICC T20 World Cup । आयपीएल- 2021 नंतर आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचीही तारीख जाहीर, ‘या’ ठिकाणी होऊ शकतात सामने

TATA Group | ‘टाटा’ ग्रुपच्या ‘ताज’नं केली जगातील मातब्बर कंपन्यांवर मात

Pune News | पुण्यात भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; घोषणाबाजीनं कात्रज परिसर दणाणला, माजी मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती