1 कोटीची लाच घेणार्‍या रेल्वे अधिकार्‍यासह तिघांना CBI कडून अटक, नोकरी देण्याच्या नावाने उकळत होते पैसे

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने वरिष्ठ रेल्वे अधिकारी महेंद्र सिंह चौहानला 1 कोटी रुपयांची लाच घेण्याच्या प्रकरणात पकडले आहे. महेंद्र सिंहसोबत इतर दोन लोकांना सुद्धा पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक कोटी रूपये सुद्धा जप्त केले आहेत. 1985 च्या बॅचचे अधिकारी महेंद्र सिंह यांना लाच घेण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.

सीबीआय सूत्रांनी सांगितले की, रेल्वेमध्ये अलिकडच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात लाच घेताना रंगेहाथ पकडले जाण्याचे हे मोठे प्रकरण आहे. अधिकारी नॉर्दन ईस्टर्न फ्रंटियर रेल्वेजमध्ये काम देण्याच्या नावाखाली लाच मागत होता. सीबीआयने पाच राज्यांमध्ये 20 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने 1 कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली महेंद्र सिंह चौहानला अटक केली आहे. महेंद्र सिंह चौहानवर नॉर्दन ईस्टर्न फ्रंटियर रेल्वेजमध्ये एका प्रायव्हेट कंपनीत काम देण्याच्या नावाखाली लाच मागितल्याचा आरोप आहे.

ज्या दोन लोकांना अटक करण्यात आली आहे ते महेंद्र सिंह चौहानच्या नावावर लाच घेत होते. सीबीआय सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, याची माहिती मिळाली होती की, महेंद्र सिंह चौहान पूर्वोत्तर रेल्वेमध्ये काम देण्याच्या नावावर एका कंपनीकडून 1 कोटी रुपयांची लाच मागत आहे. नंतर सापळा रचण्यात आला. महेंद्र सिंह चौहानचे दोन कथित साथीदार जेव्हा लाच स्वीकारत होते, त्याच वेळी सीबीआयच्या अधिकार्‍यांनी दोघांना ताब्यात घेतले. सीबीआय अधिकार्‍यांना संशय आहे की, महेंद्र सिंह चौहानने अगोदरसुद्धा लाच घेतली होती.