सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या ‘या’ IAS ऑफिसरच्या घरावर सीबीआयचा छापा

लखनऊ : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या बी. चंद्रकला या IAS ऑफिसरच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. तेलंगना येथील करीमनगरमध्ये राहणाऱ्या बी. चंद्रकला या २००८ च्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल होत असतात. त्यामुळे त्या सतत सोशल मीडियावर चर्चेच असणाऱ्या आयएएस अधिकारी आहेत. बी. चंद्रकला या सध्या उत्तर प्रदेशात काम करत असून यांच्यावर खाण घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे.

हमीरपुर अवैध खाण घोटाळ्याप्रकरणी आज (शनिवार) सीबीआयने लखनऊमध्ये विवध ठिकाणी छापे टाकले. यामध्ये बि. चंद्रकला यांच्या लखनऊमधील घरावरदेखील सीबीआयने छापा टाकला. बी. चंद्रकला या हमीरपुर आणि बुलंदशहराच्या जिल्हाधीकारी होत्या. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अवैध उत्खनन केल्याचा आरोप आहे. या छेपेमारीमुळे अखिलेश यादव यांच्या अचडणीत वाढ होऊ शकते. न्यायालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सीबीआयने टाकलेल्या छाप्यामध्ये अनेक महत्वाचे कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत. बी. चंद्रकला या लखनऊ मधील योजना भवन जवळील सफायर अपर्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. सीबीआयने याप्रकरणी लखनऊ आणि कानपुर तसेच अन्य ठिकाणी सीबाआयने छापे टाकले आहेत.

चंद्रकला यांच्यावर हमीरपुर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असताना त्यांच्यावर खाण घोटाळ्याचा आरोप झाला होता. बी. चंद्रकला यांनी मौरंग येथील ५० खाणी भाडेपट्ट्याने दिल्या होत्या. परंतु खाण भाडेपट्ट्यान देताना टेंकर काढणे गरजेचे आहे. मात्र या प्रकरणात असे घडले नसल्याने स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला होता. तसेच यप्रकरणात २०१५ साली हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

बी. चंद्रकला यांनी त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिलेली नाही. त्यांची अनेक ठिकाणी बेनावी संपत्ती असण्याचीही शक्यता आहे. बेनावी संपत्ती आणि खाण घोटाळ्यासंदर्भातला आरोप यामुळे सीबीआयकडून वारंवार त्याच्या संपत्तीवर छापा मारण्यात येत आहे. बी. चंद्रकला फेसबुकवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. त्यामुळेच फेसबुकवर त्यांचे 85 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. फेब्रुवारी 2016 मध्ये बी चंद्रकला या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी त्यांचा फोटो काढणाऱ्या एका 18 वर्षांच्या मुलाला जेलमध्ये टाकलं होतं.

या अटकेसंदर्भात विचारण्यासाठी एका रिपोर्टने चंद्रकला यांना फोन केला तेव्हा त्यांनी आपल्या उत्तरातून वाद ओढवून घेतला होता. चंद्रकला यांनी त्या रिपोर्टरच्या घरी एक अज्ञात व्यक्ती पाठवण्याची धमकी दिली होती. मूळ हैद्राबादच्या असणाऱ्या चंद्रकला यांची पहिल्यांदा युपीच्या बुलंदशहर इथं पोस्टिंग झाली होती.खराब रस्ते बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सवरील कारवाईमुळे बी चंद्रकला आधी चर्चेत आल्या होत्या.या धडक कारवाईमुळे त्यांची मथुरा इथं बदली करण्यात आली.चंद्रकला यांची पहिली बदली ही अवघ्या 129 दिवसांत करण्यात आली होती.त्या मथुराच्या दुसऱ्या महिला जिल्हादंडाधिकारी ठरल्या.

चंद्रकला यांनी अलाहबाद इथं SDM आणि CDO या पदांवरही काम केलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप होत आहेत.या आरोपांनंतर आता चंद्रकला यांच्या संपत्तीवर सीबीआयने छापेमारी सुरू केली आहे.या छाप्यांमध्ये काही महत्त्वाची कागपत्रही सीबीआयच्या हाती लागण्याची शक्यता आहे.एकूणच सध्या बी चंद्रकला यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. यासंदर्भात बी चंद्रकला यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पुढे वाचा या एका लग्नानं आणि लग्नातल्या ‘या’ साडीनं गाजवलं वर्ष