Central Government | केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नोकरी गमावणार्‍यांना 2022 पर्यंत मिळेल PF

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Central Government | कोरोना महामारीमुळे नोकरी गमावणार्‍यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी म्हटले की, ज्या लोकांनी या महामारी दरम्यान आपली नोकरी गमावली आहे, त्या सर्वांच्या ईपीएफओ (EPFO) अकाऊंटमध्ये सरकार 2022 पर्यंत पीएफ (PF) चे अंशदान जमा करणार आहे. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले की, ज्या लोकांचे ईपीएफओमध्ये रजिस्ट्रेशन असेल, त्याच लोकांना या सुविधेचा (Central Government) लाभ मिळेल.

मनरेगाचे बजेट वाढून 1 लाख कोटी

त्यांनी म्हटले कोरोनामुळे रोजगारावर आलेले संकट पाहता या वर्षाचे मनरेगाचे बजेट 60 हजार कोटी रुपयांवरून वाढवून एक लाख कोटी रुपये केले आहे.

युनिट्सचे ईपीएफओमध्ये रजिस्ट्रेशन आवश्यक

अर्थमंत्र्यांनी म्हटले की, केंद्र सरकार त्या लोकांसाठी 2022 पर्यंत कंपनीसह कर्मचार्‍याच्या पीएफच्या वाट्याचे पैसे भरेल, ज्यांनी नोकरी गमावली आहे.
परंतु त्यांना औपचारिक क्षेत्रात छोट्या प्रमाणात नोकरीत काम करण्यासाठी पुन्हा बोलावले,
अशा युनिट्सचे ईपीएफओमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सुद्धा ही सुविधा दिली जाईल.

MSME ला जे स्थान दशकांत मिळाले नाही ते आम्ही देतोय

अर्थमंत्री म्हणाल्या, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना
(एमएसएमई) दशकांपर्यंत जे स्थान मिळाले नाही ते केंद्रातील सध्याचे मोदी सरकार देत आहे.
पुढे सुद्धा ते आणखी चांगले केले जाईल.
मागील दोन वर्षात केंद्र सरकारने खुप वेगळ्या गोष्टी केल्या आहेत.
सरकारने एमएसएमईची व्याख्या खुप लवचिक प्रकारे बदलली.
संसदेत एक विधेयक आणले आहे ज्यांचा थेट फायदा एमएसएमई क्षेत्राला होईल.

 

Web Title : Central Government | big decision of the central government those who lost their jobs will get pf by 2022 know everything

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Diabetes | सायलेंट किलर आहे डायबिटीज, ‘या’ 7 वस्तूंनी ब्लड शुगर होईल नैसर्गिकरित्या नियंत्रित

Union Minister Narayan Rane | ‘एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत, BJP मध्ये आले तर स्वागतच’

Multibagger Stock | 3.40 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले करोडपती, 1 लाख झाले 1.61 कोटी, जाणून घ्या कसे?