Pune News : केंद्र सरकार महागाई रोखण्यात अपयशी; युवक काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात “विश्वासघात आंदोलन”

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार महागाई रोखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारची नागरिकाप्रतीची विश्वासघातकी वृत्ती समोर आली आहे. सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारला जनता धडा शिकविलाच पाहिजे, असे स्पष्ट मत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केले.

पिंपरी- चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने चिंचवड चौकात सततची इंधन आणि घरगुती वापराच्या गॅसच्या दरवाढीविरोधात विश्वासघात आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, कौस्तुभ नवले, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, शिवव्यापारी संघटनेचे अध्यक्ष युवराज दाखले, सामाजिक कार्यकर्ते आण्णा पंद्री, कष्टकरी कामगार परिषदेचे नेते प्रल्हाद कांबळे, बहुजन चळवळीतले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे, मीनाताई कांबळे शहर काँग्रेसचे संदेश नवले, आबा खराडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस राहूल काळभोर, शंकर ढोरे, विरेंद्र गायकवाड, गणेश शितोळे, हर्षवर्धन पांढारकर, विशाल सरवदे, अनिल सोनकांबळे, मिंलिद बनसोडे, अलोक लाड, अर्णव कामठे, अमित जगदाळे, तेजस पाटील, प्रविण जाधव, तेजस पवार, आफताब खान, नईम शेख, जाकीर चौधरी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी केंद्रातील मोदी सरकारविरोधात सबके साथ विश्वासघात ! अब की बार बूरे फसे यार ! झुठे वादे ! झुठी सरकार ! भाजपा सरकार मुर्दाबाद ! अशा घोषणा देण्यात आल्या. पेट्रोलने शंभरी गाठल्याने उपहासात्मक दर-शतक साजरे करण्यात आले. यासाठी काही कार्यकर्त्यांनी डोक्यावर क्रिकेट हेल्मेट व हातात बॅट घेऊन विडंबनात्मक सेंचुरी सेलिब्रेशन करत केंद्र सरकारचा निषेध केला.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन म्हणाले की, काँग्रेस सरकार पैशामध्ये इंधन दरवाढ करत होते. त्यावेळी भाजपवाले आंदोलन करीत सरकारचा निषेध करीत होती. मात्र, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून पैशात नाही, तर थेट रुपयांमध्ये इंधन दरवाढ करून जनतेची लूट करत आहे. सरकार सामान्यांसाठी नाही, तर धनदांडग्यांसाठी राज्य करीत आहे. उत्पादन शुल्क 30 रुपयांनी वाढविलेली ते कमी करावी. इतिहासात पेट्रोलच्या दराने प्रति लिटर शंभरी ओलांडली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एका बॅरल कच्च्या तेलाची किंमत ६० डॉलरच्या आसपास आहे. काँग्रेस सरकारच्या काळात शंभर रुपये डॉलर असताना भारतात पेट्रोल व डिझेलने प्रति लिटर ७० आणि 80 रुपयांपर्यंत पोहोचले होते, असे त्यांनी सांगितले.