खुशखबर ! आता देशात १४ ठिकाणी ‘वॉटर एरोड्रोम’ विमानतळ, प्रवाशांना होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांना हवाई प्रवासाशी जोडण्याच्या हेतूने केंद्र सरकारने देशातील १४ ठिकाण वॉटर एरोड्रोम बनविण्यासाठी निवडले आहे. यातील बहुतांश स्थळे पर्यटन स्थळं किंवा आयलॅँड आहे. या अशा विमानतळावरून सी- प्लेन उडान भरणार आहे. हि माहिती केंद्रीय नागरिक उड्डाण राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राज्यसभा मध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना दिली.

केंद्रीय मंत्री यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार गुजरात मध्ये ४, आसाम मध्ये २, उत्तराखंड मध्ये १, महाराष्ट्रात २, तेलंगणात १, अंदमान निकोबार द्वीप समूहात ४ अशा ठिकाणी वॉटर एरोड्रोमचे विमानतळ उभारण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी विमानतळ उभारण्यात येणार आहे त्यात गुजरात मध्ये स्टेच्यू ऑफ यूनिटी सरदार सरोवर बांध, साबरमती रिवर फ्रंट अहमदाबाद, धरोज बांध, शत्रुंजय बांध, आसाम मध्ये उमरांगसू जलाशय, गुवाहाटी रिवर फ्रंट, उत्तराखंडात टिहरी बांध, महाराष्ट्रात चंद्रपुर जिल्हातील इरई बांध, नागपुर मधील खिंडसी बांध, तेलंगणातील नागार्जुन सरोवर, अंदमान निकोबार द्वीप समूहातील लॉग आयलॅँड, नील आयलॅँड (शहीद द्वीप), हैवलॉक आयलॅँड (स्वराज द्वीप), हटबे यांचा समावेश असणार आहे.

हे विमानतळ पाण्यामध्ये उभे केले जाणार आहे. जिथे सी- प्लेन अगदी आरामात लॅँड आणि टेकऑफ घेऊ शकते. या विमानतळावरील विमानांचे दुरुस्ती करण्यासाठी पाण्याच्या बाजूला एक इमारत बांधली आहे आणि विमानांच्या पार्किंग साठी जेट्टी डॉकची निर्मिती करण्यात येणार आहे.

‘बीफ’ खाणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका अधिक

यकृताच्या समस्येसाठी ‘कच्ची पपई’ ठरेल रामबाण उपाय

‘किवी’ हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर

जमीन नावावर होत नाही, महिलेची मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी

धनंजय मुंडें यांच्या अडचणी वाढ ; वंचितकडून ‘हा’ नेता निवडणुकीच्या रिंगणात