धक्कादायक ! डबे सोडून पंचवटी एक्स्प्रेसचं इंजिन पुढे ; मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली 

ADV
कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – कल्याणजवळ मनमाड-पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाड – मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे इंजिन तीन ते चार डबे घेऊन पुढे गेली, तर इतर डबे मात्र मागेच राहिले. यामुळे रेल्वेमधील अनेक प्रवाशांचा खेळंबा झाला असून सर्व जलद ट्रेन मागे रखडल्या आहेत. या घटनेमुळे मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार उघडकीस आला आहे. कल्याणजवळ ही घटना घडली.

कपलिंग तुटले तेव्हा गाडीला मोठा झटका बसला. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. पंचवटी एक्स्प्रेस मनमाडहून सीएसएमटीच्या दिशेने जात असताना कल्याणजवळ हा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. परंतु यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कपलिंग तुटण्याची ही घटना दुसऱ्यांदा घडली आहे. गेल्या वर्षी दिवा-डोंबिवली मार्गावरही कपलिंग तुटल्याची घटना घडली होती.