Central Railway News | मध्य रेल्वेच्या 11 कर्मचाऱ्यांचा ‘महाव्यवस्थापक सुरक्षा’ पुरस्काराने सत्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Central Railway News | मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी कर्तव्याच्या वेळी त्यांच्या सतर्कतेचे कौतुक म्हणून दि. १३.९.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CST Mumbai) येथे रेल्वे ऑपरेशन्समध्ये अनुचित घटना टाळण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात योगदान असलेल्या मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना (मुंबई विभागातून तीन आणि नागपूर, पुणे, सोलापूर आणि भुसावळ विभागातून प्रत्येकी दोन) ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’ प्रदान (Central Railway News) केला.

पुरस्कारात प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्र आणि २०००/-रुपये रोख आहे.
ऑगस्ट २०२१ महिन्यात कर्तव्यावर असताना संभाव्य रेल्वे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या सुरक्षा श्रेणीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सतर्कतेसाठी आणि त्वरित केलेल्या कारवाईसाठी निवडले गेले.

नामदेव रेंडे, लोको पायलट आणि राजेश बानोडिया, सह-लोको पायलट 01222 अप विशेष राजधानी यांचे भायखळा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विभागातील तत्पर सतर्कतेसाठी, एस. के. प्रधान, 02193 चे लोको पायलट (मुंबई विभागाच्या कल्याण येथील), प्रशांत भगत, लोको पायलट, नागपूर विभाग आणि व्ही. अय्यप्पन, लोको पायलट, दौंड, सोलापूर विभाग यांनी त्यांच्या गाड्या वेळेवर थांबवून संभाव्य अनुचित
घटना टाळण्यासाठी त्याप्रमाणेच अमित परदेशी, कनिष्ठ अभियंता (कॅरेज आणि वॅगन) यांना नागपूर विभागातील बल्हारशाह यार्डमध्ये झुकलेल्या अवस्थेत एका डब्याच्या खालचे स्प्रिंग लक्षात घेतल्याबद्दल, श्री कप्तान सिंह बनसकर, किर्लोस्करवाडी, पुणे विभाग यांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान वेल्ड फ्रॅक्चर शोधल्याबद्दल,

सुभाष कुमार, ट्रॅक मेंटेनर, रहिमतपूर, पुणे विभाग, पुलाच्या जवळील जॉईंट फ्रॅक्चर लक्षात आणल्याबद्दल,
श्री सुधीर कुमार, खलासी, दौंड, सोलापूर विभाग यांनी एका वॅगनचा तुटलेला भाग वेळीच पाहिल्याबद्दल,
श्री परशुराम यादव, पॉइंट्समन, भुसावळ विभाग यांनी खेरवाडी स्थानकात 04152 डाउन विशेषच्या तृतीय वातानुकूलित डब्ब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग पाहिल्यामुळे मोठी अनुचित घटना टळली, भुसावळ यार्डमध्ये तुटलेली टंग रेल (रूळ) लक्षात आणणारे भुसावळ यार्डचे श्री बबलू शेख मोहिउद्दीन यांना पुरस्कार देण्यात आले.

 

अनिल कुमार लाहोटी, संबोधित करताना म्हणाले की, सुरक्षित काम करण्यासाठी रेल्वे
कर्मचाऱ्यांमध्ये चोवीस तास सतर्कता त्यांना प्रेरित करेल आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तत्परतेने काम करतील.

बी. के. दादाभोय, अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि श्री आलोक सिंह, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी
आणि मध्य रेल्वेचे विभाग प्रमुख, इतर प्रमुख यावेळी उपस्थित होते आणि सर्व विभागांचे विभागीय
रेल्वे व्यवस्थापक या कार्यक्रमात सामील झाले.
बैठकीदरम्यान सर्व कोविड -19 प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले.

 

Web Title : Central Railway News | 11 Central Railway employees felicitated with ‘General Manager Security’ award

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sangli Anti Corruption | 1000 रुपयाची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Osmanabad NCP | मल्हार आर्मीचे प्रमुख आणि मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे करणार राष्ट्रवादीत प्रवेश; ‘वंचित’ला धक्का

Crime News | तब्बल 5 वर्षापासून महिला कॉन्स्टेबलचं डीएसपीसोबत होतं ‘लफडं’; पोलिस अधिकार्‍यामुळं तिनं सोडलं पतीला, 50 अश्लील व्हिडीओ