Sangli Anti Corruption | 1000 रुपयाची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  Sangli Anti Corruption | मजूरांच्या हजेरी मस्टरवर (Labor attendance muster) सही करुन मस्टर जत पंचायत समिती येथे पाठवण्यासाठी दोन हजारीची लाच मागून 1 हजार लाच स्विकारताना (Accepting Bribe) जत तालुक्यातील (Jat taluka) कोसारी ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून (Sangli Anti Corruption) अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.13) जत येथील संभाजीनगर मोरे कॉलनी येथे केली. संजय यमुना भाते Sanjay Yamuna Bhate (वय-46) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने (mahatma gandhi rojgar hami yojana) अंतर्गत पंचायत समिती जत यांचेकडून मंजूर झालेल्या गोठ्याचे काम मजूर लावून सुरु केले आहे.
या कामावरील मजूरांच्या हजेरी मस्टरवर सही करुन हे मस्टर जत पंचायत समिती येथे पाठवीण्यासाठी भाते याने तक्रारदार याच्याकडे 2 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीमध्ये 1 हजार रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau) तक्रार केली.
एसीबीने पडताळणी केली असता ग्रामविकास अधिकारी भाते याने एक हजार रुपये लाच
मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज (सोमवार) जत येथील संभाजीनगर येथील मोरे कॉलनी
येथे सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून एक हजाराची लाच स्विकारताना भाते याला रंगेहाथ पकडले.
संजय भाते याच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात (Jat police station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), सुहास नाडगौडा
(Addl SP Suhas Nadgauda), पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे (Deputy Superintendent of Police Sujay Ghatge) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे (Inspector of Police Gurudatta More), पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले (Prashant Chowgule),
पोलीस अंमलदार संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, संजय कलकुटगी, श्रीपती देशपांडे,
अविनाश सागर, राधिका माने, सिमा माने, चालक बाळासाहेब पवार यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Sangli Anti Corruption | Village Development Officer caught taking anti corruption bribe of Rs 1000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | तब्बल 5 वर्षापासून महिला कॉन्स्टेबलचं डीएसपीसोबत होतं ‘लफडं’; पोलिस अधिकार्‍यामुळं तिनं सोडलं पतीला, 50 अश्लील व्हिडीओ

Gold Price Today | चांदीत मोठी घसरण, सोन्याचे दर वाढले; जाणून घ्या नवीन दर

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 254 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी